बातम्या

लोकअदालतीत थेट जखमी पक्षकारांपर्यंत पोहचून न्यायाधीशांनी घडवून आणला समेट

lokadalat in kolhapur


By Administrator - 9/12/2023 6:04:30 PM
Share This News:



लोकअदालतीत थेट जखमी पक्षकारांपर्यंत पोहचून न्यायाधीशांनी घडवून आणला समेट

लोक आदालत मुळे पक्षकार व आरोपींना किफायतशीर

कोल्हापूर : ९ डिसेंबर  रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयात करण्यात आले होते. यावेळी पक्षकारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

 एका दिवाणी प्रकरणातील जखमी पक्षकार हा जिल्हा न्यायालयातील प्रवेश दारापर्यंत व्हील चेअरवरून आला असून तो पॅनेल पर्यंत पोहोचू शकत नसल्याची बाब त्यांच्या वकीलांनी पॅनेल न्यायाधीश  प्रशांत राणे यांच्या निदर्शनास आणून दिली.

 त्यानंतर लगेचच  पॅनेल न्यायाधीशांनी सदरची बाब जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  प्रितम पाटील यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तात्काळ सचिव प्रितम पाटील, पॅनेल न्यायाधीश . प्रशांत राणे, पॅनेल वकील, पक्षकारांचे वकील वन्यायालयीन कर्मचारी हे तात्काळ पक्षकारांपर्यंत थेट जागेवर पोहोचले.

सदर प्रकरणात पॅनेल न्यायाधीश प्रशांत राणे यांनी दोन्ही पक्षकारांशी योग्यप्रकारे संवाद साधून प्रकरणात तडजोड घडवून आणली व प्रकरण काढून घेण्यात येवून ते निकाली करण्यात आले. सदर प्रकरण तडजोडीने व सामंजस्याने मिटल्याने दोन्ही पक्षकारांच्या चेह-यावर समाधान जाणवत होते.


लोकअदालतीत थेट जखमी पक्षकारांपर्यंत पोहचून न्यायाधीशांनी घडवून आणला समेट