बातम्या

१५ जानेवारी रोजी जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिनाचे आयोजन 

mahila loksahi din


By Administrator - 1/13/2024 2:49:14 PM
Share This News:



१५ जानेवारी रोजी जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिनाचे आयोजन 
 
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे मार्फत आयोजन 

पीडित महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित राहण्याचे आवाहन 

            कोल्हापूर, :   सण 2024 मधील पहिला  महिला लोकशाही दिनाचे आयोजन  .15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे करण्यातआले आहे,लोकशाही दिनास पिडीत महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित रहावे,असे आवाहन  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. शिर्के यांनी केले आहे.
 
           जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरील महिला लोकशाही दिन तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी, जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येतो.  अशी माहिती  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. शिर्के यांनी दिली आहे 

कोल्हापूर जिल्ह्यातील समस्याग्रस्त महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच पिडीत महिलांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन पाळण्यात येतो . पिडीत महिलांच्या तक्रारी व अडचणीची सोडवणूक शासकीय यंत्रणांनी करावी यासाठी तालुका, जिल्हा, विभागीय व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिन  सुरू केला आहे राज्यभर महिला लोकशाही दिन सरकारने सुरु केल्यानंतर त्याला भरघोष प्रतिसाद मिळेल व महिलांच्या समस्यांचे निवारण होईल हा मूळ उद्देश आहे 


१५ जानेवारी रोजी जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिनाचे आयोजन