बातम्या

२६ नोव्हेंबरला  अंकली येथे राज्यस्तरीय वधू वर मेळावा व सत्कार संभारंभ 

marriage melava ceremomy


By Administrator - 11/21/2023 1:10:30 PM
Share This News:



२६ नोव्हेंबरला  अंकली येथे राज्यस्तरीय वधू वर मेळावा व सत्कार संभारंभ 

श्री लिंगायत कुंभार समाज सेवाभावी संस्था,महाराष्ट्र यांचे  वतीने राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याचे आयोजन 

कामगारमंत्री महाराष्ट्र राज्य व सांगली जिल्हा पालकमंत्री यांचे प्रमुख उपस्थितीत होणार हा मेळावा 


श्री लिंगायत कुंभार समाज सेवाभावी संस्था,महाराष्ट्र राज्य यांचे  वतीने लिंगायत बांधवासाठी राज्यस्तरीय वधुवर मेळाव्याचे आयोजन केले आहे हे आयोजन  26नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी १० वाजल्यापासून  कुंभार मंगल कार्यालय , जैन पाइप समोर, सांगली- कोल्हापूर रोड ,अंकली येथे संपन्न होणारआहे 

या मेळाव्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील लिंगायत कुंभार बांधवानी आपल्या नातेवाईकांची तसेच मुला मुलीची नावे नोंद करून या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे

मुला मुलींच्या पालकांच्या कामांच्या व्यस्ततेचा विचार करून आणि विविध अडचणींमुळे विवाह करताना येणारे अडथळे दूर व्हावे व विवाह लवकर तेही योग्य वेळेत आणि योग्य जोडीदारासोबतच जुळावे,यासाठी स्पेशल दिवाळीच्या सुट्ट्यांचे निमित्त साधून गावाकडील नोकरी, व्यवसाय , शिक्षण करणारे मुलं-मुली आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विविध शहरांमधून सुट्यांचे गावाकडे येणाऱ्या मुला मुलींसाठी प्रत्येकाने स्वतः साठी संपूर्ण दिवस राखीव ठेवावा या दिवशी भव्य असा वधु-वर परिचय मेळावा आणि त्यामध्ये त्यांची प्रत्यक्ष भेट व्हावी यासाठी संबंधित वधु-वर, त्यांच्या पालकांनी  आणि समाज बांधवांनी मेळाव्याला येण्याचे आवाहन लिंगायत कुंभार  समाज सेवा भावी संस्था अंकली तर्फे करण्यात आले आहे.

यावेळी लिंगायत कुंभार समाजातील यशस्वी,हुशार  मुलांचा , विविध क्षेत्रात पुरस्कार मिळवलेल्या बांधवांचा मानसन्मान, सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे 

अंकली हे  मध्यवर्ती ठिकाणी असल्याने कर्नाटक , महाराष्ट्र राज्यातून तसेच ,पुणे, मुंबई, नाशिक, सातारा,सांगली,मिरज सोलापुर या कोणत्याही ठिकाणाहून येण्यासाठी सोयीचे आहे.


हा मेळावा कामगारमंत्री महाराष्ट्र राज्य व सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व आमदार सुधीर दादा गाडगीळ , उप जिल्हाधिकारी डी एस कुंभार ,सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र आण्णा कुंभार ,डॉक्टर उत्तम कुंभार,प्राचार्य राजेंद्र कुंभार उद्योगपती आर.टी कुंभार ,बालरोग तज्ञ् डॉ सुहास कुंभार  व  कुंभार समाजाचे अध्यक्ष किरण कुंभार   या मान्यवरांच्या उपस्थितीत  होणार आहे 

तरी सर्व समाज बांधव भगिनी यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा व आपली जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवावी असे  आवाहन करण्यात आले आहे 

या मेळाव्याचे आयोजन श्री लिंगायत कुंभार समाज सेवाभावी संस्था , महाराष्ट्र राज्यचे  अध्यक्ष किरण कुंभार ,कार्याध्यक्ष सोमनाथ कुंभार ,संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अण्णा कुंभार , उपाध्यक्ष  लक्ष्मण कुंभार ,संस्थेचे सचिव दत्ता कुंभार ,खजिनदार भरत कुंभार ,सर्व संचालक सदस्य सल्लागार व कार्यकारिणी मंडळ तसेच सर्व समाज बांधव कार्यकर्ते यांच्या मोलाच्या सहकार्यातून होत आहे

 


२६ नोव्हेंबरला  अंकली येथे राज्यस्तरीय वधू वर मेळावा व सत्कार संभारंभ