बातम्या
शिवजयंती दिवशी केदारकंठ शिखरावर शिवध्वज फडकवणार 5 वर्षीय गिर्यारोहक अन्वी घाटगे
By Administrator - 2/17/2025 4:24:43 PM
Share This News:
शिवजयंती दिवशी केदारकंठ शिखरावर शिवध्वज फडकवणार 5 वर्षीय गिर्यारोहक अन्वी घाटगे
कोल्हापूरच्या अन्वी अनिता चेतन घाटगे, वय 5, ह्या जगातील सर्वात लहान आणि वेगवान गिर्यारोहक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी 5 वर्ल्ड रेकॉर्ड, 6 आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि 6 इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी आपला ठसा निर्माण केला आहे. अन्वीने वयाच्या 2 वर्षे 11 महिन्यांमध्ये कळसुबाई शिखर चढून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.
.%5B3%5D.jpg)
शिवजयंतीच्या निमित्ताने, 17 फेब्रुवारी रोजी अन्वीने उत्तराखंडमधील 12,500 फूट उंचीवर असलेल्या केदारकंठ शिखरावर चढाईस सुरुवात केली आहे. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीस त्या शिखरावर पोहोचून शिवध्वज फडकवणार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूजन करणार आहेत.
या मोहिमेसाठी अन्वीला विविध मान्यवरांकडून शुभेच्छा मिळाल्या आहेत. मोहिमेच्या सहलीत तिचे वडील चेतन घाटगे, प्रशिक्षक अनिता घाटगे आणि प्रा. अनिल मगर सर तिच्या सोबत आहेत.
तिच्या या साहसिक मोहिमेला युवा वर्ल्डचे तेजस जिबकाटे यांनी आखणी केली आहे.
शिवजयंती दिवशी केदारकंठ शिखरावर शिवध्वज फडकवणार 5 वर्षीय गिर्यारोहक अन्वी घाटगे
|