बातम्या
पन्हाळा शाहूवाडीत मोठया प्रमाणात बेकायदेशीर प्लॉट विक्री सुरू
By neeta - 10/1/2024 2:29:57 PM
Share This News:
पन्हाळा : पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील डोंगराळ भागात निवासी बिनशेती, प्रयोजनकरिता - ले आऊटला सक्षम प्राधिकारी यांची परवानगी न घेताच खुल्या जमिनीचे तुकडे - प्लॉट पाडून विक्री केली जात आहे. तसेच बरीच अनधिकृत बांधकाम बांधणे सुरू आहे. यामुळे आशा खरीदेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे निर्देशनात आले आहे .
त्यामुळे लोकांनी पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यात जमीन खरेदी करत असताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, पन्हाळा शाहूवाडीत डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात आहे आता डोंगराळ भागात बरीचशी बेकायदेशीररित्या बांधकाम सुरू आहेत. प्लॉट पडून जमिनीची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्याच्यामुळे खूप लोकांना फसवणूक होत आहे असे आमच्या निर्देशात आले आहे. याबाबतच्या तक्रारी तहसीलदार कार्यालय आणि प्रांत ऑफिसमध्ये करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांनी पन्हाळामध्ये जमीन खरेदी करत असताना, थोडीशी काळजी घ्यावी. काही ठिकाणी लेआउट केले आहेत जे बेकायदेशीर त्याला कुणाची मान्यता नसलेली आहेत. अशा प्लॉटची विक्री केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी लेआउट अधिकृत आहे की अनधिकृत याची तहसीलदार ऑफिसला अथवा प्रांत ऑफिसला चौकशी करावी. त्याचबरोबर बांधकाम परवानगी असल्याशिवाय कमर्शियल ,फार्म हाऊस बांधणीसाठी संशोधन अथवा प्रांत ऑफिसच्या परवानगी बांधकामाला काढू नये. अन्यथा ते बांधकाम थांबवले जातील. लोकांनी खात्री करून प्लॉटची खरेदी विक्री करावी यासाठी कोणीही तुमच्याशी संपर्क साधत असतील तर याबाबत तहसीलदार कार्यालयात किंवा प्रांत ऑफिसमध्ये माहिती घ्यावी असे त्यांनी सांगितले
पन्हाळा शाहूवाडीत मोठया प्रमाणात बेकायदेशीर प्लॉट विक्री सुरू
|