राजकीय
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कागल शाखेचे उद्घाटन
By Administrator - 10/18/2023 2:51:57 PM
Share This News:
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कागल शाखेचे उद्घाटन
सामाजिक एकसंघतेने अन्यायाच्या प्रतिकारा बरोबर समाज विकास पण व्हावा...!!!
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे
कागल
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कागल शाखेचे उद्घाटन कागल येथे प्रा. सुभाष वायदंडे यांचे हस्ते झाले उदघाटनावेळी ते म्हणाले ,एखादी विशिष्ट घटना घडली कि समाज पेटून उठून अन्यायाविरुद्ध लढ़ा देऊन न्याय मागण्यासाठी एक होतो , तसाच तो समाजाच्या विकासासाठी ही एक झाला पाहीजे अशी भूमिका पुरोगामी संघर्ष परिषद या सामाजिक संघटनेची असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष गणेश घाडगे व पश्चिम महाराष्ट्र वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकाश वायदंडे होते.
स्वागत व प्रास्ताविक कागल शहर अध्यक्ष संजय दावणे यांनी केले,शेवटी आभार कागल तालुका उपाध्यक्ष नामदेव साठे यांनी मानले
यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य संभाजी चौगुले, वरिष्ठ जिल्हाध्यक्ष दौलत घाटगे, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अर्जुन सोनुले, कागल तालुका अध्यक्ष योगेश हेगडे,अमर विटे, कागल शहर उपाध्यक्ष विलास दावणे, सुशीला दावणे, उज्वला अवघडे, भारती दावणे,शिवानी दावणे, रेखा दावणे, निलेश दावणे, विजय अवघडे, सागर दावणे, सदाशिव दावणे, दिलीप दावणे, भिकाजी शिंदे, दीपक सोनुले, संभाजी दावणे ,आकाश दावणे, अमोल दावणे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे कागल तालुका व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कागल शाखेचे उद्घाटन
|