बातम्या
वनखात्याच्या दुर्लक्ष पणामुळे आणखी किती जिवांचा बळी घेणार आहे
By Administrator - 11/12/2023 12:56:03 PM
Share This News:
प्रतिनिधी :पांडुरंग फिरंगे
वनखात्याच्या दुर्लक्ष पणामुळे आणखी किती जिवांचा बळी घेणार आहे?
दिवसा ढवळ्या हल्ला चढवला असताना याबाबत वनखाते डोळेझाक करत आहेत.
हल्ल्या घटनाघडूनही खात्याचा दुर्लक्ष पणा का?
प्रत्येक वेळी खात्याच्या दुर्लक्ष पणामुळे घटना घडूनही गेली की खात्याला जाग येते? आणखी किती जणांचे बळी जाण्याची वाट खाते बघणार आहे?असा सवाल जनतेतून केला आहे?
बच्चे सावर्डे गावात खडी भागातील जयवंत रामचंद्र पाटील यांच्या सातबिगे शेतात कोगनोळी ,कर्नाटक येथील मेंढपाळ रावसाहेब कोळेकर हे आपल्या मेंढ्या चरवण्यासाठी घेऊन गेले होते.
यावेळी ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका मेंढीवर हल्ला करून ठार केले यावेळी मेंढपाळची पाळीव कुत्र्यांनी मोठ्याने भुंकण्यास सुरवात केली यावेळी मेंढपाळ यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड करण्यास सुरवात केली त्याचवेळी बिबट्याने आपल्या जबड्यातील मेंढी सोडून देऊन पळ काढला.याची माहिती पोलीस पाटील सागर यादव यांना समजताच त्यांनी घटना स्थळी धाव घेऊन पाहणी केली व याची माहिती वन विभाग पन्हाळा यांना दिली.
यावेळी तात्काळ वनविभाग पन्हाळा अधिकारी अनिल मोहिते,वनपाल सागर पटकारे,वनरक्षक संदीप पाटील यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला.तसेच बिबट्याच्या शोधासाठी कोल्हापूर रेस्क्यू टीम यांना पाचारण केले.रेस्क्यु टीमचे प्रदीप सुतार व वन विभाग पन्हाळा पोलीस पाटील यांनी ड्रोन कॅमेरा द्वारे बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.तसेच बिबट्याचा शोध घेण्यासाठी बिबट्याने ठार केलेली मेंढी त्याच ठिकाणी ठेऊन सदर ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले
.यामध्ये २ बिबट्या दिसून आले.यामध्ये बिबट्यांनी त्या मेंढीस ऊसाच्या शेतात घेऊन गेले.सावर्डे गावात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांनी शेतात जाताना एकटे जाऊ नये,सोबत बॅटरी काठी बाळगावी,मोबाईल चालू ठेवावा,बोलत जावे तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असे आव्हाहन वनविभाग यांनी केले आहे.
वनखात्याच्या दुर्लक्ष पणामुळे आणखी किती जिवांचा बळी घेणार आहे?
|