बातम्या
कोल्हापूरात 21 व 22 सप्टेंबरला "निसर्गोत्सव"
By Administrator - 9/20/2024 4:47:10 PM
Share This News:
कोल्हापूरात 21 व 22 सप्टेंबरला "निसर्गोत्सव"
*जागतिक सेंद्रिय दिनाचे औचित्य : विषमुक्त उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन*
कोल्हापूर, दि.18 : जागतिक सेंद्रिय दिनाचे औचित्य साधून सेंद्रिय शेती आणि उत्पादनांबद्दल जनजागृती करण्यासाठी कोल्हापूरात 21 व 22 सप्टेंबर रोजी "निसर्गोत्सव" या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात चर्चासत्र, तज्ञांचे मार्गदर्शन आणि विविध उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री असे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इकोस्वास्थ्यचे डॉ. दिलीप माळी, किर्लोस्कर वसुंधराचे शरद आजगेकर, आणि प्रसारमाध्यमांचे प्रताप पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जैवविविधता, जमिनीची सुपीकता आणि मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेती हा एक शाश्वत मार्ग आहे. "निसर्गोत्सव" चा उद्देश सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती करणे हा आहे.
राजारामपुरी आठव्या गल्लीतील भारत हौसिंग सोसायटीच्या सभागृहात होणाऱ्या या दोन दिवसीय कार्यक्रमात सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल, देशी वाणांची बी-बियाणे, रोपे, सेंद्रिय भाजीपाला, रानभाज्या, आणि विविध खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. तज्ञ मार्गदर्शनासह टेरेस गार्डन, सेंद्रिय शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली जाणार आहे.
तिरुपती क्रेन सर्व्हिस या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.
कोल्हापूरात 21 व 22 सप्टेंबरला "निसर्गोत्सव"
|