बातम्या

नेज ग्रामपंचायत सरपंचाच्या विरोधात पदाचा गैरवापर केल्याबद्दल ग्रामसभेत सदस्य व नागरिकांचा अविश्वास ठराव

no confidence motion by members and citizens in Gram Sabha against Nej Gram Panchayat Sarpanch for abuse of office


By nisha patil - 7/17/2023 10:26:22 PM
Share This News:



कुंभोज वार्ताहर (विनोद शिंगे) नेज ता हातकणंगले येथील ग्रामपंचायत विद्यमान सरपंच दिपाली गोधंळी यांच्यावर सत्ताधारी आघाडी बरोबरच ग्रामस्थांनी पदाचा गैरवापर केल्याबद्दल अविश्वास ठराव एकमताने मंजूर केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी सरपंचांचा सदस्यांना विचारात न घेता चाललेला मनमानी कारभार, त्याच पद्धतीने सरपंच दिपाली गोंधळी यांच्या पतीचा ग्रामपंचायत मध्ये असणारा हस्तक्षेप यामुळे ग्रामस्थांनी सरपंच व त्यांचा चाललेला गैर कारभार याबद्दल नाराजी व्यक्त करत सत्ताधारी आघाडीतील काही सदस्य व ग्रामस्थांनी अविश्वास ठराव दाखल करण्याचा प्रस्ताव ग्रामसभेत मांडला.
         

यावेळी उपस्थित 80% पेक्षा जास्त नागरिकांनी सरपंचांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा ठराव हातवर करून मंजूर केला. गेल्या अडीच वर्षात सरपंचांनी कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार केला आहे त्यामध्ये कोणत्याही महिला सदस्याला कारभारात सहभागी करून घेतले नाही, त्याच पद्धतीने आपल्या पदाचा गैरवापर केल्यामुळे नाराज असणाऱ्या सदस्यांनीच आज ग्रामपंचायत मध्ये सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात यावा अशी मागणी उपसरपंच मनोज कांबळे यांनी ग्रामसभेमध्ये केली.
       

यावेळी ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतीने अनेक कमिट्या स्थापन केले असून कोणत्याही सदस्याला कमिटीत विचारात न घेता निर्णय स्वतः सरपंच घेतात,तसेच घंटागाडी, घनकचरा,रस्ते, पाणंद रस्तेअगंणवाडि इमारत दुरावस्था यावरहि चर्चा झाली, तसेच यावेळी प्रलंबित असणारे विकास कामे याकडे ग्रामपंचायतचे असणारे दुर्लक्ष, दोन सदस्य अपात्रची केस  आयुक्त यांच्याकडे असताना सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेला मनमानी कारभार व त्यांना मीटिंगला न बोलवण्याचे काढलेला आदेश याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरपंच व ग्रामसेवक यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अपात्र सदस्यांचा अजून निर्णय झालेला नसल्याने सदर बाब न्यायप्रविष्ठ आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतीने हस्तक्षेप करू नये असा ठराव नागरिकांच्या वतीने करण्यात आला. यावेळी अनेक प्रश्नावर नागरिक व ग्रामपंचायत सदस्यांची हमरी तुमरी झाली, यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाला ग्रामसेवक व सरपंच यांना समर्पक उत्तरे देतान आल्याने नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली.
     

परिणामी ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या पती देवाने ग्रामपंचायत मध्ये हस्तक्षेप करू नये असाही ठराव करण्यात आला, यावेळी बाबासाहेब शिंगे, विनोद कांबळे, शितल खिचडे, बी जे पाटील,राँबट घाटगे,बाजीराव जाधव,संजय कांबळे यांनी गावातील अनेक प्रश्न ताणून धरले व ग्रामसेवक व सरपंचांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
 

यावेळी नेज ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच यांच्या पतीदेवाने ग्रामपंचायतीमधील दोन हजार रुपये स्वखर्चासाठी घेतल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, सरपंच दिपाली गोंधळी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याची जोरदार मागणी केली. अविश्वास ठरावासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले. यावेळी ठराव मंजुरीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी समर्थन दिले.यावेळी सत्ताधारी गटातील सदस्याची शांतता बरच काही सांगुण गेली. तसेच ग्रामोसभेमध्ये गटनेतेच्या अंगावर काही नागरिकांनी धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी मध्यस्थीनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.


नेज ग्रामपंचायत सरपंचाच्या विरोधात पदाचा गैरवापर केल्याबद्दल ग्रामसभेत सदस्य व नागरिकांचा अविश्वास ठराव