बातम्या
ग्रामीण जत्रांत परप्रांतीय मुलींचे नाचगाणे थांबवावे - युवा सेनेची मागणी
By nisha patil - 5/25/2024 10:35:41 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात उरूस, जत्रा व यात्रेत ट्रॉली शो व रोड शोच्या निमित्ताने होणाऱ्या परप्रांतीय मुलींच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशा मागणीचे निवेदन
युवा सेना (उद्धव ठाकरे) जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी जिल्हा पोलिस विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना दिले. अशा कार्यक्रमांवर बंदी घातली नाही तर युवा सेना स्टाईलने ते कार्यक्रम बंद पाडू, असा इशाराही यावेळी माने यांनी दिला.जिल्ह्यातील ग्रामीण भागात ट्रॉली शोमध्ये ग्रुप डान्सच्या नावाखाली केवळ मुलींचा डान्स होत असून त्या मुली निव्वळ अश्लील हावभाव करत नाचगाणे करतात. त्यामुळे पोलीसn प्रशासनाने अशा कार्यक्रमांच्या आयोजनांवर बंदी घालावी, असे निवेदनात म्हटले आहे. पोलिस निरीक्षक सावंत यांनी अशा प्रकारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी जिल्हा चिटणीस अमित बाबर, शहर समन्व्यक रघू भावे, प्रथमेश देशिंगे, चैतन्य देशपांडे, अक्षय घाटगे, सानिका
दामूगडे, प्रिया माने आदी उपस्थित होते.
ग्रामीण जत्रांत परप्रांतीय मुलींचे नाचगाणे थांबवावे - युवा सेनेची मागणी
|