बातम्या
खास तीन पत्ती खेळण्यासाठी घरफोडी करत असलेल्या चोराला पोलिसांनी अखेर पकडलं
By surekha - 8/22/2023 6:13:53 PM
Share This News:
खास तीन पत्ती खेळण्यासाठी घरफोडी करत असलेल्या चोराला पोलिसांनी अखेर पकडलं
पुण्यात कधी, कोण आणि कशासाठी काय करेल याचा काही नेम नाही. काही दिवसांपासून पुण्यातील चोरदेखील चोरीसाठी नव्या शक्कल लढवताना दिसत आहे. मात्र खास तीन पत्ती खेळण्यासाठी घरफोडी करत असलेल्या चोराला अखेर पोलिसांनी पडकलं आहे. पोलिसांनी या चोराकडून 27 लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. तर चोरलेली 11 लाखांची रोकड त्याने ऑनलाइन जुगारात उडवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
मनीष जीवनलाल राय असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बंगल्यातून 11 लाखांची रोकड आणि 55 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 38 लाख 50हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषण करीत मनीष राय याला अटक केली. तो मूळचा मध्यप्रदेशच्या कटणी येथील आहे. अधिक माहितीनुसार, आरोपीला मोबाईलवर ऑनलाइन तीनपत्ती जुगार खेळण्याची सवय आहे. जुगारात पैसे हरल्यामुळे त्याने घरफोडी केली. परंतु घरफोडीत चोरलेली 11 लाख रुपयेही तो जुगारात हरला. घरफोडी करुन तो अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
खास तीन पत्ती खेळण्यासाठी घरफोडी करत असलेल्या चोराला पोलिसांनी अखेर पकडलं
|