बातम्या

आयुक्त के. मंजुलक्ष्मींनी रंकाळा परिसराची पाहणी करून दिले आदेश

ordered to inspect the area of ​​Rankala


By nisha patil - 1/21/2025 1:57:53 PM
Share This News:



आयुक्त के. मंजुलक्ष्मींनी रंकाळा परिसराची पाहणी करून दिले आदेश 

रंकाळ्यावर कपडे,जनावरे धुतल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल... 

 महापालिकेने रंकाळा तलावात जनावरे, कपडे, गाड्धा धुण्यासाठी मनाई केली असताना देखील असे प्रकार सुरू असल्याने रंकाळा तलावातील पाणी प्रदूषण थांबणार असा प्रश्न निर्माण झालाय. आयुक्त के. मंजुलक्ष्मींनी चार दिवसांपूर्वी रंकाळा परिसराची पाहणी करून तलावात कपडे, जनावरे, धुतल्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत.

महापालिकेने तलावाच्या पाण्यात जनावरे, कपडे, गाड्या धुण्यासाठी मनाई केली असताना देखील असे प्रकार सुरू असल्याने रंकाळा तलावातील पाणी प्रदूषण थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित झालाय. रंकाळा तलावात जनावरे व कपडे धुण्यास मनाई असून कपडे धुणे आजही सुरू आहे. त्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होत आहे. रंकाळा तलाव परिसरात महापालिकेने जनावरे व कपडे धुण्यासाठी वेगळी व्यवस्था करून दिली पाहिजे. वाहने धुण्यासाठी पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी चार दिवसांपूर्वी रंकाळा परिसराची पाहणी करून तलावात कपडे, जनावरे, धुतल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत.


आयुक्त के. मंजुलक्ष्मींनी रंकाळा परिसराची पाहणी करून दिले आदेश
Total Views: 87