बातम्या

जेबी स्पोर्ट्स यांच्या वतीने पन्हाळा प्रीमियर लीग संपन्न

premier lig in pahnala


By Administrator - 2/18/2024 9:33:14 PM
Share This News:



जेबी स्पोर्ट्स यांच्या वतीने पन्हाळा प्रीमियर लीग संपन्न...

पन्हाळा : जे बी स्पोर्ट यांच्या वतीने पन्हाळा प्रीमियर लिगचे 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून  प्रथम क्रमांक 10 हजार 555 रोख रक्कम देण्यात आली तर द्वितीय क्रमांक 7555  तर तृतीय बक्षीस 5 हजार 555 अशी रक्कम बक्षीस रूपाने देण्यात आली.

यावेळी मॅन ऑफ द सिरीज सायकलचा मानकरी ओंकार पाटील,  बेस्ट  बॉलर विभागात सुरज कासे तर बेस्ट  बॅट्समन विभागात सिद्धार्थ सोरटे यांची निवड करण्यात आली. जेबी स्पोर्ट्स यांच्यावतीने पन्हाळा प्रीमियरच्या लीग मध्ये एकूण पाच संघ होते.यात प्रथम क्रमांक  युद्धवीर  मालक,  सागर गोसावी  द्वितीय क्रमांक, संघर्ष ग्रुप मालक साहिल पवार तर तृतीय क्रमांक  अरुण शेठ  मालक तय्यब मुजावर यांनी पटकावला आहे.


जेबी स्पोर्ट्स यांच्या वतीने पन्हाळा प्रीमियर लीग संपन्न