राजकीय

माझ्यासारख्या शिवसैनिकांंनी आता गोळी घालून घ्यायची का? ...अन मुरलीधर जाधव ढसाढसा रडले

press by murlidhr jadhav


By Administrator - 5/1/2024 3:08:28 PM
Share This News:



माझ्यासारख्या शिवसैनिकांंनी आता गोळी घालून घ्यायची का? ...अन मुरलीधर जाधव ढसाढसा रडले

कोल्हापूर - मी शिवसैनिक आहे. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्या. प्रसंगी अंगावर वार घेतले. मग लोकसभेला उभंं राहावं असं मलापण वाटणारच. मी माझी भूमिका मांडली यात काय गैर आहे. उद्धव ठाकरे माझे दैवत आहे, अजूनही मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने सोबतच राहणार, अशी भूमिका आज ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मांडली. ते कोल्हापूर प्रेस क्लब इथं बोलत होते. विशेष म्हणजे हे सांगताना ते ढसाढसा रडले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना भेटले होते. या भेटीवरून मुरलीधर जाधव यांनी त्यांच्या विरोधात वक्तव्य केलं होत. त्यानंतर त्यांची अचानक जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळंं नाराज झालेल्या जाधव यांनी आज कोल्हापुरातील प्रेस क्लब इथं पत्रकार बैठक घेवून आपली भूमिका स्पष्ट केली.

👉अजूनही मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने सोबतच-
मी गेली कित्येक वर्षे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करतोय. मी लाठ्याकाठ्या खाल्या, प्रसंगी अंगावर वार घेतले मात्र मागे हटलो नाही. उद्धव ठाकरे हे माझे दैवत आहे, अजूनही मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने सोबतच राहणार, अशी भूमिका आज ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मांडली. उचलबांगडी केल्यानंतर मुरलीधर जाधव आता काय भूमिका घेणार, कोणत्या पक्षात जाणार, याकड सर्वांचं लक्ष लागलं होत. गेले दोन दिवस सुरु असलेल्या या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला.

👉माझ्यासारख्या शिवसैनिकांनी आता गोळी घालून घ्यायची का?-
विठ्ठलाच्या शेजारच्या लोकांनी, बडव्यांनी कान भरलेत म्हणून आपल्यावर अन्याय झाला असल्याचं मत यावेळी जाधव यांनी सांगितले.


माझ्यासारख्या शिवसैनिकांंनी आता गोळी घालून घ्यायची का? ...अन मुरलीधर जाधव ढसाढसा रडले