बातम्या
मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ 'स्वाभिमानी'चा कँडल मोर्चा
By nisha patil - 7/27/2023 6:13:11 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये मणिपूरसह देशात होत असलेल्या अत्याचाराचा निषेधार्थ कँडल मोर्चा काढण्यात आला.इचलकरंजीमधील शेकडो महिलांनी कँडल मोर्चामध्ये सहभागी होत संताप व्यक्त केला. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेमध्ये काम करणाऱ्या तरुणी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.यावेळी इचलकरंजी शहरातील शेकडो महिलांनी कँडल मोर्चामध्ये सहभागी होत संताप व्यक्त केला.स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेमध्ये काम करणाऱ्या शेकडो तरुणी विद्यार्थिनी सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.पाऊस असतानाही महिला सहभागी झाल्या.सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास कँडल मोर्चाला प्रारंभ झाला.शिवतीर्थावरून मोर्चाला प्रारंभ झाल्यानंतर मुख्य मार्गावरून महात्मा गांधी पुतळ्याजवळ आला.यावेळी पावसाच्या सरी कोसळत असतानाही मोर्चा काढण्यात आला.या मोर्चामध्ये प्रताप होगाडे, सदाभाऊ मलाबादे, सौरभ शेट्टी, प्रसाद कुलकर्णी, दिलीप जगोजे, अण्णासाहेब शहापुरे पद्माराणी पाटील, आदींसह शेकडो महिला आणि नागरिक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.मणिपूरमध्ये मानवी क्रौयाची परिसीमा गाठली गेली आहे. जवानाच्या पत्नीवरही अत्याचार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यासह देशात संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तीन दिवस अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ 'स्वाभिमानी'चा कँडल मोर्चा
|