बातम्या
‘ही’ योगासने करून प्राप्त करू शकता तजेलदार आणि निर्मळ त्वचा
By nisha patil - 1/4/2024 7:18:15 AM
Share This News:
योग केल्याने तणावमुक्ती, निरोगी शरीर, आणि ताकद मिळते. शिवाय योगाचे आणखीही काही लाभ आहेत, ते म्हणजे शांत झोप लागणे, शरीरातील विषारी तत्व बाहेर पडल्याने त्वचेवर एक नैसर्गिक चमक येणे आदी फायदे आहेत. योगाच्या मदतीने पुरळ, फोड, काळे डाग यामधून मुक्ती मिळते आणि त्वचा साफ होते.
शीर्षासन
या आसनामुळे शरीरातील रक्तप्रवाह उलटा होतो म्हणजेच पायाकडून डोक्याकडे होतो. यामुळे त्वचेला चमक मिळते. हे आसन नियमितपणे केल्यास त्वचेवरील सुरकुत्या नष्ट होतात.
उत्तानासन
या आसनामध्येही शरीरातील रक्तप्रवाह उलटा होतो. हे सूर्यनमस्कारांतील एक आसन असून यामुळे शरीर लवचिक होण्यासही मदत होते.
हलासन
या आसनाच्या माध्यमातून शरीरातील ब्लड सक्र्युलेशन चेहरा आणि डोक्याकडे वाढते, यामुळे आपल्या चेहरा चमकदार होतो.
सर्वांगासन
यामध्येसुद्धा रक्तप्रवाह पायाकडून डोक्याकडे होतो. यामुळे त्वचा साफ आणि सुरकुत्यारहित होते.
‘ही’ योगासने करून प्राप्त करू शकता तजेलदार आणि निर्मळ त्वचा
|