राजकीय

हद्दवाढ, खंडपीठ, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आदी कोल्हापूरचे प्रश्न लवकर मार्गी लागू दे

rajesh kshirsagar in mumbai


By Administrator - 9/22/2023 2:14:08 PM
Share This News:



हद्दवाढ, खंडपीठ, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आदी कोल्हापूरचे प्रश्न लवकर मार्गी लागू दे

 श्री.राजेश क्षीरसागर यांचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या गणरायाला साकडे

 कोल्हापूर जिल्ह्याचे गेले अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांमुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. शहराची हद्दवाढ, मे.मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र आराखड्याचा विषय प्रामुख्याने ऐरणीवर येत आहे. 

मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जनकल्याणकारी काम सुरु असून, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू देत असे साकडे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी असणाऱ्या श्री गणरायाला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी घातले.

 राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, युवा सेना कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा अध्यक्ष श्री.ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी मा.मुख्यमंत्री याचे वर्षा बंगला या निवासस्थानी विराजमान श्री गणरायाचे आज दर्शन घेतले.


हद्दवाढ, खंडपीठ, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आदी कोल्हापूरचे प्रश्न लवकर मार्गी लागू दे