बातम्या

कोल्हापूर ते पुणे महामार्गावरील अकरा रेल्वे फाटक बंद ; यात रुकडी फाटकाचा समावेश

relwy closed fatak


By Administrator - 5/1/2024 1:19:06 PM
Share This News:



कोल्हापूर ते पुणे महामार्गावरील अकरा रेल्वे फाटक बंद ; यात रुकडी फाटकाचा समावेश

 कोल्हापूर : रेल्वे गाड्यांचा प्रवास सुरक्षित व जलद गतीने व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन नेहमी प्रयत्न करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या नऊ महिन्यात कोल्हापूर ते पुणे मार्गावरील 11 रेल्वे फाटक बंद केली आहेत. यात रुकडी (ता. हातकणंगले) फाटकाचा समावेश आहे. त्यामुळे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या अर्धा ते पाऊण तासाची वेळेची बचत होणार आहे.
      रेल्वे मार्गाच्या सुरक्षितेची पाहणी करण्यात आली. त्यानुसार रेल्वेच्या सुरक्षा विभागाने वरील माहिती दिली आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकातून एकूण नऊ गाड्या सुटतात. तेवढ्याच गाड्या रोज येतात तर मिरज हे जंक्शन असल्याने दक्षिण उत्तर भागातील प्रवास करणाऱ्या गाड्यांची येजा मोठ्या प्रमाणात होते. यात मिरज ते पुणे मार्गावर सर्वाधिक गाड्या धावतात त्यासाठी असलेल्या रेल्वे मार्गावर दोन गावे किंवा शहरांकडे जाण्यासाठी रेल्वे ओलांडावे लागत होते. त्यासाठी सुरक्षितेचा भाग म्हणून रेल्वे फाटक आहेत. रेल्वे नकाशावर जाण्याच्या वेळेत फाटक बंद होतात. तरीही काही वेळा फडकातून वाकून जाणारे पादचारी दुचाकी स्वार, सायकल स्वार किंवा जनावरे यांचा अडथळा होतो. तेव्हा रेल्वेचा वेग कमी होतो तर काही वेळा रेल्वे फाटक बंद करण्यात विलंब झाल्यास सिग्नल मिळाला नाही तर यात रेल्वे फटकाच्या मागे थांबून राहतात. आधी तांत्रिक समस्या उद्भवतात. 
   पुणे ते कोल्हापूर मार्गावरील 11 फटकांवर वर्दळ  मोठी असते अशा फटकांवर उड्डाणपूल किंवा भुयारी फुल बांधण्यात आले. त्यामुळे रेल्वे रुळावरून किंवा खालून रस्त्यावरील वाहनांची वाहतूक सुरू झाली. परिणामी फाटकांचा वापर करावा लागणार नाही असे फाटक बंद करण्यात आले कोल्हापुरातील रुकडी येथे उड्डाणपूल झाला आहे. इचलकरंजी ते कोल्हापूर मार्गावरील वाहतूक उडान पुलावरून होत असल्याने रेल्वे फाटकाचा वापर करावा लागणार नाही. पुणे ते मिरज मार्गावरील उर्वरित दहा फाटक बंद केले आहेत यात पुणे ते दौंड मार्गावरील दोन दौंड ते बारामती मार्गावरील दोन मिरज ते सातारा मार्गावरील सहा फडकांचा समावेश आहे.


कोल्हापूर ते पुणे महामार्गावरील अकरा रेल्वे फाटक बंद ; यात रुकडी फाटकाचा समावेश