बातम्या

उदं ..  गं  आई उदं .. च्या गजरात रेणुका देवी यात्रा संपन्न 

renuka yatra


By Administrator - 3/3/2024 8:01:54 PM
Share This News:



उदं ..  गं  आई उदं .. च्या गजरात रेणुका देवी यात्रा संपन्न 

बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळ गावात रेणुका देवी यात्रेचे आयोजन 
 

आई रेणूका यात्रा विकास भक्त मंडल अक्कोळ यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन 

सौन्दत्ती येथे रेणुकादेवीचे यात्रेनिमित्त लाखो  भाविक विशेष करून महाराष्ट्र व कर्नाटकातून दाखल होतात, लाखो लोकांचे भक्तीस्थान असलेले रेणुका देवीची यात्रा सालाबादप्रमाणे यावर्षी २४फेब्रुवारी रोजी संपन्न झाली यानंतर सौन्दत्ती येथे यात्रेसाठी गेलेले भाविक,देवीचे जगवाले परत आपल्या स्थळी परत येतात 

बेळगावातील निपाणी तालुक्यातील आक्कोळ गावी श्री महादेव पुणेकर देवमामा यांनी सौन्दत्ती घटप्रभा येथून परत आल्यानंतर रेणुका यात्रा विकास भक्त मंडळ यांचेवतिने महाप्रसादाचे आयोजन केले होते 
आक्कोळ येथील सोनार मळ्यात आई रेणुकादेवीचे जग भाविकांचे दर्शनासाठी ठेवले होते ,यावेळी सोनारमळ्यात दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती मोठ्या भक्तिभावाने हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला ,तसेच प्रसादाचा आस्वाद घेतला . यावेळी रेणुका भक्तासाठी भजनाचा ,आईचे गीताचा संगीताचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला 

या यात्रेसाठी आक्कोळ गावातील भाविक तसेच आजूबाजूचे गावातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते , उदं ..  गं  आई उदं .. च्या गजरात रेणुका देवी यात्रा संपन्न झाली . रेणूका यात्रा विकास भक्त मंडल यांनी सर्व भाविकांची उत्तम व्यवस्था केली होती 

यावेळी,रेणूका माता देवस्थान समितीचे सर्व्हेसर्वा श्री महादेव पुणेकर उर्फ देवमामा(जगवाले),प्रकाश पुणेकर (जगवाले),अमृत आवळे ,
पश्चिम महाराष्ट्र पत्रकार संघतना अध्यक्ष श्री विकास शिवाजी पुणेकर, देवस्थान व्यास्थपक श्री श्री शिवाजी पुणेकर , बादशाह खलिफा, यात्रा कमितीचे अध्यक्ष शंकर हारके, भरमा हारके,संजीवनी खोडे,सिंधू भोसले,महादेव नाईक याची उपस्थिती होती


उदं ..  गं  आई उदं .. च्या गजरात रेणुका देवी यात्रा संपन्न