बातम्या
दारु बंदी ठरावामुळे शिरढोणच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास
By Administrator - 9/13/2023 1:01:24 PM
Share This News:
*दारु बंदी ठरावामुळे शिरढोणच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास*
*ग्रामसभेत मटका ,दारु बंदी ठराव केल्याचा परिणाम *
शिरढोण/ प्रतिनिधी(संजय गायकवाड)/ता.१३
शिरढोण (ता.शिरोळ) गावात बेकायदेशीर दारु विक्री तसेच मटका बंद झाल्याने रस्तावर होणारी प्रचंड गर्दी कमी झाली असून रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे त्यामुळे अबाल वृद्धांसह महिलांना रस्त्यावरून जाणे सहज शक्य झाले आहे
शिरढोण गावात बेकायदेशीरित्या दारु विक्री तसेच मटका,जुगार राजरोस खेळला जात असल्याने मद्यपी व मटका खेळणाऱ्यांची रस्त्यांवर प्रचंड गर्दी होत होती. त्यामुळे महिला अबाल वृद्धांना रस्त्यावरून जाणे मुश्किल झाले होते तसेच महिलाना बघून मद्यपी, मटका खेळणारे अश्लील हावभाव करून रस्त्यावर वाटेल त्या पद्धतीने सायकल, मोटार सायकल पार्किंग केले जात होते त्यामुळे रस्त्यावरून जाताना महिलाना अडथळ्याची शर्यत पार करावी लागायची.
ग्रामपंचायतीने घेतलेल्या महिला ग्रामसभेत दारु बंदीसह अवैध धंदे बंद करण्याचा ठराव झाल्यानंतर गावातील संपूर्ण दारु बंदी तसेच मटका बंद झाल्याने सकाळ संध्याकाळ रस्त्यावर होणारी प्रचंड गर्दी कमी झाल्याने दिवटे गल्लीचा चौक, बौद्ध समाजाकडे जाणार रस्ता , दर्गा चौक, माळभाग वरील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे .
कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील पोलीस यांनी दारु विक्री करणारे, मटका घेणारे आणि जुगार खेळणारे यांच्या वरती करडी नजर ठेऊन आहेतः त्यामुळे शिरढोण गावातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.दरम्यान पोलिसांनी कायम स्वरुपी अवैध धंद्याला हद्दपार करण्याची मागणी महिला वर्गातून करण्यात येत आहे
दारु बंदी ठरावामुळे शिरढोणच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास
|