बातम्या
कर्तव्यदक्ष तुरुंग अधिकारी शिवाजी उर्फ मारुती ज्ञानदेव ढवळे यांचे दुःखद निधन
By Administrator - 8/6/2024 11:21:22 AM
Share This News:
कर्तव्यदक्ष तुरुंग अधिकारी शिवाजी उर्फ मारुती ज्ञानदेव ढवळे यांचे दुःखद निधन
कोल्हापूर दि. 08 : कोल्हापूर शहरातील रुईकर कॉलनी येथील राहणारे,व एके काळी एक कडक शिस्तप्रिय, व कर्तव्यदक्ष तुरुंग अधिकारी म्हणून १९८० च्या दशकात ज्यांची ख्याती होती ते श्री.शिवाजी उर्फ मारुती ज्ञानदेव ढवळे वय.वर्षे ८३ यांचे आज दिनांक ७ जून २०२४ रोजी पहाटे ०६.०० वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले.
त्यांनी आपल्या कार्यकाळात अत्यंत प्रामाणिक पणे आपले कर्तव्य पार पाडले, त्यांचे या कामामुळेच त्यांना हर्षद मेहता सारख्या अतिशय महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाच्या कैध्याच्या करीता खास नियुक्तीने भायखळा जेलची जबाबदारी सोपवली होती. अंडरवल्ड मधील कुप्रसिद्ध डी गॅंग मधील कैदी ऑर्थररोड जेलमध्ये असतांना ही त्यांची तेथे खास नियुक्ती केलेली होती. त्याच बरोबर त्यांनी महाराष्ट्रभर नागपूर,कोल्हापूर येथील कळंबा जेल,व सरते शेवटी आटपाडी जेल येथे तुरुंग अधीक्षक म्हणून आपल्या नोकरीची सांगता केली. राजारामपुरी ८ वी गल्ली येथील श्री. विजय नारायणराव जाधव व श्री.संजय नारायणराव जाधव निवृत्त पोलीस निरीक्षक यांचे ते मेव्हणे होते.
त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी श्रीमती सरलाताई शिवाजीराव जाधव त्यांचे सुपुत्र श्री.रणजित उर्फ पिंटू शिवाजीराव ढवळे, संदीप उर्फ बंटी शिवाजीराव ढवळे, व त्यांची उदगाव येथे दिलेली मुलगी श्रीमती शर्मिला जाधव असे आहेत.त्यांच्या मागे सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कर्तव्यदक्ष तुरुंग अधिकारी शिवाजी उर्फ मारुती ज्ञानदेव ढवळे यांचे दुःखद निधन
|