राजकीय
लाभार्थ्यांना आता नेत्यांच्या दारात चकरा माराव्या लागणार नाहीत
By Administrator - 10/16/2023 4:52:22 PM
Share This News:
" समरजीतसिंह घाटगे आपल्या दारी" या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक, हीच कार्यकर्त्यांच्या कष्टाची पोचपावती... ......
राजे समरजितसिंह घाटगे
लाभार्थ्यांना आता नेत्यांच्या दारात चकरा माराव्या लागणार नाहीत
कागल,प्रतिनिधी.
समरजीतसिंह घाटगे आपल्या दारी" चला पोहचवूया राजे विक्रमसिंह घाटगे यांचे विधायक विचार घरोघरी या उपक्रमांचे आज सर्व थरातून कौतुक होत आहे. हीच कार्यकर्त्यांच्या कष्टाची पोचपावती आहे ,असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजीतसिंह घाटगे यांनी केले.
येथे स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त राजे फौंडेशन व राजमाता जिजाऊ समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चला संकल्प करुया ७५हजार लाभार्थ्यांना लाभ देऊया उपक्रमांतर्गत समरजितसिंह आपल्या दारी अभियानअंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटपवेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले,केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या आवाहनानुसार आमचे कार्यकर्ते थेट लाभार्थ्यांच्या घरी जात आहेत. शासनाच्या ज्या योजनेपासून संबंधित लाभार्थी वंचित आहे त्याची कागदपत्रे जमा करून घेऊन आमच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत त्यांना शासनाच्या सर्व योजनेचा लाभ मिळवून देत आहेत. त्यासाठी लाभार्थ्याला आता नेत्यांच्या दारात चकरा मारण्याची गरज नाही. तर समरजीतसिंह आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जनतेचा एक सेवक म्हणून शासकीय दाखले आम्ही घरपोच देत आहोत हेच या योजनेचे वेगळेपण आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेताना विरोधकांनी गटतट बघून काम केले.त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले आहेत.अशा लाभार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचून त्यांना लाभ देत आहोत.
या निमित्ताने प्रातिनिधीक स्वरूपात एकवीस लाभार्थ्यांना थेट घरी जाऊन श्री घाटगे यांनी मंजुरी पत्रांचे वाटप केले.
रमीज मुजावर म्हणाले, संजय गांधी निराधार ची पेन्शन 600 वरून एक हजार व एक हजार वरून पंधराशे करणेचे श्रेय फडणवीसाहेब यांना जाते. त्यांच्या काळातच तो जी आर झाला आहे.या योजनेच्या लाभार्थ्यांची मुले 25 वर्षाची झाल्यावर त्यांची पेन्शन बंद न करता सुरू ठेवण्याबाबत समरजीतसिंह घाटगे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा
केला होता हे विरोधकांनी विसरू नये. तुम्ही आत्ताच सत्तेवर आला आणि या योजनेची श्रेय घेण्याचा प्रयत्न करता तो करू नये कागल ची जनता सर्व काही जाणते.
तुम्ही शासकीय योजनेचा लाभ देताना लाभार्थींना वेटीस धरता.आम्ही मात्र शासकीय योजनेचे लाभ कोणताही दबाव न आणता एकही रुपया न घेता मिळवून देत आहोत.हाच तुमच्या आणि आमच्यातील फरक आहे असा टोला नाव न घेता लगावला.
यावेळी बाबगोंडा पाटील,शिवाजी आवटे,शाहूचे संचालक यशवंत ऊर्फ बाॕबी माने,सतीश पाटील,असिफ मुल्ला, राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, संचालक राजेंद्र जाधव,आप्पासो भोसले,आप्पासो हूच्चे, धैर्यशील इंगळे,हिदायत नायकवडी,अरुण गुरव आदी उपस्थित होते.
यावेळी अमन आवटे,अक्षय घस्ते,यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत संग्राम परिट यांनी केले.प्रास्तविक रमीज मुजावर यांनी केले.आभार गंगाराम कुंभार यांनी मानले
छायाचित्र- कागल येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे मंजुरी पत्र व दाखले घरपोच दिल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करताना वयोवृद्ध लाभार्थी महिला.....
राजे बँक आपल्या दारी या उपक्रमांतर्गत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची या बँकेकडे खाते वर्ग करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.या मोहिमेचा शुभारंभ श्री घाटगे यांनी राजश्री आंबी या पेन्शनधारक महिलेचा अर्ज स्वतः भरून केला.याची चर्चा कार्यक्रम स्थळी होती.
लाभार्थ्यांना आता नेत्यांच्या दारात चकरा माराव्या लागणार नाहीत
|