राजकीय

बी आर एस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा प्रभारी पदी संजय पाटील यांची नियुक्ती

sanjay patil selected as chairperson for kolhapur


By Administrator - 1/9/2023 12:13:16 PM
Share This News:



बी आर एस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा प्रभारी पदी संजय पाटील यांची नियुक्ती

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिले नियुक्तीबाबतचे आदेश 

कोल्हापूर दि 1 सप्टेंबर

अलीकडेच अखिल भारतीय किसान काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र तसेच कोल्हापूर व राज्यातील जनसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या, रेशन ग्राहकांच्या  ,शेतकऱ्यांच्या कामगारांच्या प्रश्नांवर शेकडो लक्षवेधी आक्रमक आंदोलन करणारे संजय पाटील यांनी हैदराबाद येथील मुख्यमंत्री निवासामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  बी आर एस पक्षात प्रवेश केला होता .यावेळी महाराष्ट्र राज्याचे बी आर एस पक्षाचे प्रभारी के वामशीधर राव हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी प्रक्ष प्रवेशाच्या वेळी श्री संजय पाटील यांच्याशी कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्रातील राजकारणाच्या अनुषंगाने जवळपास चाळीस मिनिटे   तेलंगणा मुख्यमंत्री यांनी चर्चा केली व महाराष्ट्रातील सध्या परिस्थितीचा आढावा घेतलाहोता  तसेच पक्ष बळकट  करण्यासाठी ग्राम पातळीपासून सुरुवात करून पक्षांतर्गत असणारे नऊ सेल त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती तातडीने करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या होत्या 

 

 संजय पाटील यांनी यापूर्वी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पद तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद आठ वर्ष सांभाळले होते. शेकडो आंदोलने करून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांनी पदाला न्याय दिला होता .

त्यांनी गेल्या तीन महिन्यात पक्ष वाढीसाठी दिलेले योगदान व आजपर्यंत त्यांनी लक्षवेधी आंदोलनातून जनसामान्यांच्या प्रश्नांवर केलेला संघर्ष लक्षात घेऊन त्यांना संधी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या आदेशाने मुख्यमंत्र्यांचे सचिव यांनी संजय पाटील यांना कोल्हापूर जिल्हा बी आर एस पक्षाचे प्रभारी केले आहे असा संदेश दिला आहे. 

 

त्यांच्या नियुक्तीसाठी महाराष्ट्र बी आर एस पक्षाचे राज्य प्रभारी के वामशीधर राव, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब देशमुख, किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांचे सहकार्य लाभले. मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या नावाची शिफारस त्यांनी केली होतीयास  मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली 

 

    नियुक्ती झाल्यानंतर संजय पाटील यांनी  मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने पक्षाच्या अंतर्गत असणारे नऊ सेल प्राधान्याने ग्रामपंचायतीपासून जिल्हा पातळी पर्यंत बळकट करण्याच्या अनुषंगाने नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड येत्या   १५ दिवसांमध्ये केल्या जातील असे मत व्यक्त केले तसेच कोल्हापूर जिल्हात पक्ष्याच्या 50 हजार सभासद नोंदणीचे पूर्ण  करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला


बी आर एस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा प्रभारी पदी संजय पाटील यांची नियुक्ती