बातम्या
संत नामदेव महाराज समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन
By nisha patil - 8/21/2023 4:39:47 PM
Share This News:
इचलकरंजी/प्रतिनिधी - श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 673 व्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी व परिसरातील आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 3 सप्टेंबरपासून सुरु होणार्या या स्पर्धांचे 33 वे वर्ष आहे.
श्री नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवनिमित्त प्रतिवर्षी श्री नामदेव समाज सेवा मंडळ व श्री संत नामदेव युवक संघटना यांच्यावतीने आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या बौध्दिक कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रविवार 3 सप्टेंबर रोजी स्पर्धांचा उद्घाटन समारंभ होऊन इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सहा गटात चित्रकला स्पर्धा होणार आहे. सोमवार 4 सप्टेंबर रोजी इयत्ता 5 वी ते 10 या दोन गटातील सामान्यज्ञान स्पर्धा तसेच इयत्ता 3 री ते 10 या तीन गटातील निबंध स्पर्धा आणि इयत्ता 5 वी ते 10 या दोन गटातील बुध्दिबळ स्पर्धा होणार आहे. मंगळवार 5 सप्टेंबर रोजी इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटातील वक्तृत्व स्पर्धा होईल. बुधवार 6 सप्टेंबर रोजी बालवाडी ते इयत्ता चौथी पर्यंतच्या गटातील पाठांतर स्पर्धा होईल. शुक्रवार सप्टेंबर 8 सप्टेंबर रोजी इयत्ता पाचवी ते दहावी या दोन गटातील गायन स्पर्धा आणि शनिवार 9 सप्टेंबर रोजी इयत्ता पाचवी ते दहावी या दोन गटातील वेशभूषा स्पर्धा होणार आहे.
सदरच्या सर्व स्पर्धा या दाते मळा येथील श्री संत नामदेव भवन याठिकाणी संपन्न होणार असून इचलकरंजी व परिसरातील शाळांनी स्पर्धांसाठी व अधिक माहितीसाठी संत नामदेव भवन 7175587170 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री नामदेव समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरुणकर आणि युवक अध्यक्ष संदीप कल्याणकर यांनी केले आहे.
संत नामदेव महाराज समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन
|