शैक्षणिक

बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठात ३ फेब्रुवारीला शिल्पकला कार्यशाळा

sculpture workshop was held in the university on February 3


By nisha patil - 1/29/2025 9:36:31 PM
Share This News:



बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठात ३ फेब्रुवारीला शिल्पकला कार्यशाळा

कोल्हापूर, दि. २९ जानेवारी: शिल्पमहर्षी शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठात येत्या सोमवारी (दि. ३ फेब्रुवारी) शिल्पकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि शिल्पसम्राट कला स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या कलेच्या स्मृती सर्वांपर्यंत पोहोचाव्यात आणि नवशिल्पकार व कलाकारांना प्रेरणा मिळावी, या हेतूने ‘शिल्पकला कार्यशाळा-२०२५’ आयोजित केली आहे.

कार्यशाळेत बी.आर. खेडकर यांच्या कन्या शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के आणि शिल्पकार संजीव संकपाळ हे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत. ३ फेब्रुवारीला सकाळी १० ते ४ या वेळेत विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील उद्यानात कार्यशाळा होईल. कार्यशाळेतील उत्तम कलाकृतींना सन्मानचिन्हे आणि अनुक्रमे रु. २०००, रु. १००० आणि रु. ५०० रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुकांनी १ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ९०४९६४४४२३ आणि ९४२२४१६१७५ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठात ३ फेब्रुवारीला शिल्पकला कार्यशाळा
Total Views: 42