विशेष बातम्या

पंचगंगा आणि भोगावती नदीने तळघाटल्याने कोल्हापूर वासियांना भर उन्हात पाण्यासाठी वणवण

seek water in the hot sun


By nisha patil -
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी पाणीदार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात 'पाणीबाणी'ची वेळ आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात नद्यांनी तळ गाठल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे. अजून मे महिना बाकी असताना एप्रिलपासूनच नद्यांनी तळ गाठल्याने जिल्ह्यातील परिस्थिती आव्हानात्मक होत चालली आहे. गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून ऐन सणासुदीत महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे घागर घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टँकर्सकडूनही पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने बोअरवेलचा पर्याय घेतला जात आहे. मात्र, उन्हाळ्यात बहुतांश बोअरवेलला पाणी कमी येत असल्याने महापालिकेकडून 9 टँकर्सची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण शहराला पंचगंगा आणि भोगावती नदीतून पाणी उपसा केला जातो. मात्र, याच दोन्ही नद्यांनी तळ गाठल्याने उपसा होण्यावर विपरित परिणाम झाला आहे. उपसा पूर्ण क्षमतेने होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठा गंभीर झाला आहे. थेट पाईपलाईन पाणी योजना अजूनही पूर्णत्वास गेलेली नाही. त्यामुळे शहरवासियांची भर उन्हात पाण्यासाठी वणवण सुरु आहे. दुसरीकडे, कुंभी नदीने सुद्धा तळ गाठला आहे. कोल्हापूर शहरासाठी भोगावती नदीतून पाणी उपसा करण्यासाठी बालिंगा केंद्रात चार आणि नागदेववाडी केंद्रात दोन उपसा पंप आहेत. मात्र, नदीने तळ गाठल्याने उपसा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु केल्यानंतर पाणी सोडण्यात आले आहे.


Panchganga and Bhogavati rivers have flooded, leaving Kolhapur residents to seek water in the hot sun