बातम्या

डी वाय पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ५१ विद्यार्थ्यांची नामांकित हॉस्पिटलमध्ये निवड  

selection of  51 dyp  nursing student


By Administrator - 7/27/2023 6:12:23 PM
Share This News:



*डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ५१ विद्यार्थ्यांची नामांकित हॉस्पिटलमध्ये निवड* 

   कोल्हापूर

कदमवाडी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ५१ विद्यार्थ्याची नामांकित हॉस्पिटलमध्ये निवड झाली आहे. कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे हि निवड करण्यात आली आहे. 

   डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या जनरल नर्सिंग, मिडवायफरी, बी.एस.सी.नर्सिंग, पोस्ट बेसिक बी.एस.सी.नर्सिंग व एम.एस.सी.नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस ड्राईव्हमध्ये सहभाग दर्शविला

.सोनाली तेव्रत्ती                         

 

अनिकेत हेळवे

यामध्ये पुणे येथील ज्यूपिटर हॉस्पिटल मार्फत ज्योती घोडके, पूजा बरागडे, सोनाली तेव्रत्ती, अनिकेत हेळवे, धनराज पेठकर यांच्यासह २३ विद्यार्थ्यांना तत्काळ जॉब ऑफर लेटर देण्यात आले आहेत. तर कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये १३ व अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये १५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

धनराज पेठकर                            

       

ज्योती घोडके

 निवड झालेल्या विद्यार्थ्यांना डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ.सुचित्राराणी राठोड, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अमोस तळसंदेकर व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना स्कील डेव्हलपमेंटसह विविध ट्रेनिंग दिली जातात. व्यक्तिमत्व विकासावरही विशेष भर दिला जातो. याचा चांगला फायदा प्लेसमेंटसाठी झाला. 

पूजा बरागडे

          निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

 

 

 


५१ विद्यार्थ्यांची नामांकित हॉस्पिटलमध्ये निवड