बातम्या

कोल्हापूरच्या चिन्मय  संदिप  कुलकर्णीची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदी नियुक्ती 

selection of chinmay in indian armi


By Administrator - 4/12/2023 3:46:16 PM
Share This News:



 

कोल्हापूरच्या चिन्मय  संदिप  कुलकर्णीची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदी नियुक्ती 

 
कोल्हापूर: कोल्हापुरातील चिन्मय संदीप कुलकर्णी याची सैन्यदलात लेफ्टनंट पदी निवड झाली इतक्या लहान वयात त्याची या पदावर नियुक्ती झालेबाबत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. लहानपणापासूनच चिन्मय यास सैन्य दलाची ओढ होती त्याची हि आवड पाहून चिन्मयचे पालकांनी त्यास सैन्यात जाण्यास व त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीचे नियोजन करून त्यास त्याचे करियर करणेस संधी दिली 

चिन्मय हा कोल्हापुरातील न्यू  मॉडेल इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी असून त्याने न्यु पॉलीटेकनिक ,कोल्हापूर या कॉलेज मध्ये डिप्लोमा करून, विश्वकर्मा इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, पुणे या कॉलेज मध्ये (B Tech ENTC ) डिग्री पुर्ण केली 

डिग्रीनंतर त्याने S S B परीक्षा पास करून त्याची नियुक्ती भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदी झाली.  त्याचे या यशामध्ये त्याचे वडील  मोटिवेशनल अँड इंडस्ट्रियल ट्रेनर श्री संदिप चंद्रकिरण कुलकर्णी यांचे मोलाचे योगदान त्यास मिळाले आहे   संदीप कुलकर्णी हे उत्तम ट्रेनर आहेत सोबतच यशवंत  बिल्डिंग बी व सी को ऑप हौसिंग सोसायटीचे कार्यकुशल संचालक आहेत 
चिन्मय ची आई मनीषा कुलकर्णी या देखील उत्तम व्यवस्थापक असून त्यांनी चिन्मयच्या यशासाठी उत्तम नियोजन तसेच काटेकोरपणे त्याचे वेळापत्रक सांभाळून त्याला या यशाच्या शिखरापर्यंत पोहचवले आहे 


 चिन्मयच्या या यशासाठी त्याचे आई वडील ,त्याचे गुरुजन ,त्याचे मित्र या सर्वांचे मार्गदर्शन लाभले आहे  त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल यशवंत रेसिडेन्सितर्फे तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे 


कोल्हापूरच्या चिन्मय  संदिप  कुलकर्णीची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदी नियुक्ती