बातम्या

आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होणार 'श्रीकृष्णजन्माष्टमी:

sensational trailer of Thank you for coming is here


By nisha patil - 6/9/2023 4:25:58 PM
Share This News:



श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आज उत्साहात साजरा होत आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा  जन्म मथुरा नगरीत देवकीच्या आठव्या अपत्याच्या रूपात कंसाच्या कैदेत झाला. जन्माष्टमीच्या दिवशी घरोघरी श्रीकृष्णाच्या बालस्वरुपाची पूजा केली जाते. भाविक भजन आणि कीर्तन गात या दिवशी उपवास करतात, तसेच भव्य सजावटही करतात. दरम्यान, आज मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म होईल. पंचागानुसार यावर्षी जन्माष्टमी 6 आणि 7 सप्टेंबर 2023 असे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहे.  भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाची पूजा करणे अत्यंत शुभ आहे. धार्मिक पुराणानुसार, ज्यावेळेस कृष्णाचा जन्म झाला, त्यावेळी रोहिणी नक्षत्र होते. यंदाची जन्माष्टमी विशेष मानली जाते. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्र, वृषभ राशीत आणि बुधवारी झाला असे सांगितले जाते. त्यामुळे बुधवारी कृष्णाचा जन्मदिवस साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीला देवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे.आज सर्वत्र  श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे


आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होणार 'श्रीकृष्णजन्माष्टमी: