बातम्या

लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्कार डॉक्टर प्रकाश आमटे यांना जाहीर

shahu puraskar


By Administrator - 10/31/2023 4:10:29 PM
Share This News:



लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्कार डॉक्टर प्रकाश आमटे यांना जाहीर

समरजीत सिंह घाटगे , नवोदिता घाटगे यांची घोषणा

5 नोव्हेंबर रोजी पुरस्काराचे वितरण
कागल 
 कागल गडचिरोली तालुक्यातील हेमलकसा सारख्या दुर्गम भागात गेले 50 वर्ष आदिवासी जनतेला सेवा देणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटे यांना यावर्षीच नव्याने सुरू झालेल्या लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज 2023 या पुरस्काराने सन्मानित करीत आहोत अशी घोषणा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष नवदिता घाटगे यांनी घोषणा केली


 शाहू उद्योग समूह कागलचे संस्थापक राजे विक्रम सिंह घाटगे यांच्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असणारे सामाजिक कार्य अविरतपणे व अखंडितपणे करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्याचे यापूर्वी जाहीर केले होते या अनुषंगाने डॉक्टर प्रकाश आमटे यांची निवड केली आहे
 1973 पासून हेमल कसा येथे लोकबिरादरीच्या माध्यमातून डॉक्टर प्रकाश आमटे डॉक्टर मंदाकिनी आमटे अहोरात्र सेवा देण्यात व वन्यप्राण्यांच्या संवर्धनात व्यस्त आहेत पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू शिक्षण संकुलनाच्या प्रांगणावर होणाऱ्या छत्रपती शाहू लोकरंग महोत्सव 2023 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे


लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्कार डॉक्टर प्रकाश आमटे यांना जाहीर