राजकीय
उद्धव ठाकरे यांना राहुल नार्वेकरांचा मोठा झटका ; शिवसेना ही शिंदेचीच.....
By Administrator - 10/1/2024 6:39:24 PM
Share This News:
उद्धव ठाकरे यांना राहुल नार्वेकरांचा मोठा झटका ; शिवसेना ही शिंदेचीच.....
मुंबई: आमदार अपात्रतेचा निकाल आज निकाल लागनार होता. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलं होतं तो निकाल अखेर जाहीर झालाच.. हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा झटका देणारा ठरला आहे हे म्हणायला काही हरकत नाही.. आमदार अपात्रता निकालाच्या सुनावणीत राहुल नार्वेकरांनी म्हणले आहे.पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत, पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे. असं झालं तर पक्षाला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाहीत. शिवसेना नेतृत्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगानं दिलेला हा निकाल स्पष्ट आहे, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना होती, भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवड ही वैध ठरते, असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख हे 2018 साली पद निर्माण करण्यात आल्याचा दावा आहे. पण अगोदर शिवसेना प्रमुख हे प्रमुख पद होते. राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये 19 मधील 14 सदस्य हे प्रतिनिधी सभेतून निवडून येणार होते तर 5 हे शिवसेना प्रमुख नियुक्त होते. 2018 सालच्या पक्षीय रचनेत केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीत, 2018 सालची पक्षाच्या घटनेतील दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही. पक्षात बंडाळी झाल्यानंतर पक्षप्रमुख या नात्यानं नेता आपला आदेश पक्षाचा आदेश म्हणून वापरू शकतो. पण जर पक्षातील इतर नेत्यांनी घटनेच्या आधारावर नवा नेता पक्षप्रमुख म्हणून निवडला असेल तर त्याचाच दावा घटनेनुसार अधिकृत मानावा लागेल.", असं निरिक्षण राहुल नार्वेकरांनी नोंदवलं आहे.
तसेच पक्षप्रमुखाला थेट कुणालाही पक्षातून काढता येत नाही.
एकनाथ शिंदेंना काढण्याचा ठाकरेंना कोणताही अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकरणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार नाही.", असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांना राहुल नार्वेकरांचा मोठा झटका ; शिवसेना ही शिंदेचीच.....
|