शैक्षणिक
प्रवेश पत्रात चूक झालेल्या "त्या" विद्यार्थ्यांनाही देता येणार बारावीची परीक्षा"
By nisha patil - 10/2/2025 12:55:40 AM
Share This News:
विमला गोयंका कॉलेजमधील परीक्षा गोंधळावर तातडीने कार्यवाही
कोल्हापूर, : विमला गोयंका कॉलेजने आय.टी., कॉम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स या विषयांसाठी मंडळ मान्यता न घेता विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून घेतल्याने त्यांच्या हॉल तिकिटांवर विषयांचा उल्लेख नव्हता. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने राज्य मंडळाशी संपर्क साधला.
राज्य मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विहित दंड आकारून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, अशी खात्री शिक्षण विभागाने दिली. फॉर्म न भरलेल्या विद्यार्थ्यांचे फॉर्म विलंब शुल्कासह भरले जातील.
१४९ विद्यार्थ्यांपैकी ७० विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले नव्हते, तर २६ जणांना विषय दुरुस्ती हवी होती. कॉलेजने आवश्यक सुधारणा वेळेत न केल्यामुळे हा गोंधळ झाला. मात्र, शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही.
विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रवेश पत्रात चूक झालेल्या "त्या" विद्यार्थ्यांनाही देता येणार बारावीची परीक्षा"
|