बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यातील सहाशे शेतकऱ्याना मिळणार ७८ लाखाचे अनुदान

thibak sinchan anudan


By Administrator - 8/31/2023 5:09:01 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यातील सहाशे शेतकऱ्याना मिळणार ७८ लाखाचे अनुदान 

ठिबक सिंचन अनुदान होणार दोन तीन दिवसात वितरित 

बी आर एस पक्षाच्या पाठपुराव्याला आणि मागणीला यश


कोल्हापूर 

 कोल्हापूर जिल्ह्यातील अंदाजे सहाशे शेतकऱ्यांचे प्रलंबित  ठिबक सिंचन  अनुदान तातडीने  महिनाअखेर पर्यंत जमा करा अन्यथा   एक सप्टेंबर रोजी मोर्चा काढून कार्यालय बंद पाडण्याचा व टाळे ठोकण्याचा  इशारा बी आर एस पक्ष्याचे वतीने कोल्हापूर कृषी अधिकारी याना  दिला  होता. 

   महाराष्ट्रामध्ये 80 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्याच्या अनुषंगाने परिपत्रक निघाले होते. या  पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळावे या मागणीचे निवेदन 11 ऑगस्ट रोजी बी आर एस पक्षाच्या वतीने जिल्हा कृषी  अधीक्षक  श्री दत्तात्रय दिवेकर यांना देण्यात आले होते 
व महिना अखेरपर्यंत अनुदान वितरित न झाल्यास एक सप्टेंबर रोजी मोर्चा काढून कार्यालय बंद पाडण्याचा व टाळे ठोकण्याचा  इशारा करण्यात आला  होता 

 बी आर एस पक्षाच्या वतीने संजय पाटील यांनी कृषी आयुक्त मंत्रालय यांचेकडे पाठपुरावा केला त्यामुळे कोल्हापुरातील शेतकऱ्यांना 78 लाख रुपये ठिबक सिंचनाचे अनुदान तातडीने दोन-तीन  दिवसात वाटू असे आश्वासन आज कृषी अधिकारी  श्री दत्तात्रय दिवेकर यांनी  दिलेले आहे  याचा लाभ जिल्यातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे .या निर्णयांमुळे  कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

 गडहिंग्लज मधील काही शेतकऱ्यांनी बी आर एस पक्ष प्रमुखांना  प्रत्यक्ष भेटून त्यांचे कार्याचा तसेच कार्यतत्परतेचे कौतुक केले आभार मानले 

बी  आर एस पक्षाचे वतीने पक्षप्रमुख  संजय पाटील, जिल्हा समन्वयक नवाज बशु ,दिलीप चव्हाण, संग्राम जाधव ,साकेत राज देशमुख ,भीमराव पाटील ,विक्रम जरग यांचे मोलाचे सहकार्य, पाठपुरावा वरील आंदोलनासाठी प्राप्त झाला  आहे 

बी आर एस पक्ष्याचे या पाठपुराव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे 


कोल्हापूर जिल्ह्यातील सहाशे शेतकऱ्याना मिळणार ७८ लाखाचे अनुदान