मनोरंजन

शाहरुखच्या 'जवान'मध्ये 'ही' मराठमोळी अभिनेत्री दिसणार अॅक्शन मोडमध्ये

this Marathmoli actress will be seen in action mode


By surekha - 12/7/2023 4:25:13 PM
Share This News:



शाहरुखच्या 'जवान'मध्ये 'ही' मराठमोळी अभिनेत्री दिसणार अॅक्शन मोडमध्ये

अभिनेता  शाहरुख खानचा जवान  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात शहारुखचा अॅक्शन अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचा प्रीव्यू सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रीव्यूमध्ये जवान चित्रपटाच्या स्टार कास्टची झलक दाखवण्यात आली आहे. जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीची देखील झलक दिसली. नेमकी ही मराठी अभिनेत्री कोण आहे याबद्दल प्रेक्षकांच्या उत्सुकता लागून राहिली आहे . जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये अभिनेत्री गिरिजा ओकची  झलक दिसली. या प्रीव्यूमध्ये गिरिजा ही अॅक्शन मोडमध्ये दिसली. जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये  दिसले की, गिरिजाच्या हातात बंदुक आहे आणि ती फायरिंग करत आहे.गिरिजा ओकनं मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं  हुप्पा हुइय्या, गुलमोहर  या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच तिनं कला, शोर इन द सिटी या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आता जवान या चित्रपटात गिरिजाचा अभिनय बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. गिरिजा ओक ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. गिरिजानं जवान चित्रपटाचा प्रीव्यू सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'We are good to go, Chief!'. गिरिजाला अनेक जण सध्या तिच्या जवान या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.


शाहरुखच्या 'जवान'मध्ये 'ही' मराठमोळी अभिनेत्री दिसणार अॅक्शन मोडमध्ये