बातम्या
डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलीटीला ‘आतिथ्य २०२४’ मध्ये उपविजेतेपद
By nisha patil - 2/14/2024 8:06:53 PM
Share This News:
डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलीटीला
‘आतिथ्य २०२४’ मध्ये उपविजेतेपद
कोल्हापूर पुणे येथील ए.आय.एस.एस.एम.एस महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘आतिथ्य २०२४’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलटीच्या विद्यार्थ्यानी उपविजेतेपद मिळवले आहे.
पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत ३६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलटीच्या दर्शन मोरे व आर्या संकपाळ यांनी ‘शॉर्ट ९०’ या विभागात उपविजेतेपद मिळवले. या दोघांनी भरडधान्यांचा वापर करून तयार केलेल्या घेवर मिठाईने परीक्षकांची मने जिंकली.
या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या दर्शन मोरे, आर्या संकपाळ, श्रुतिका मेढे, भगतसिंग पोळ, अर्चिता सतीजा, पुष्कराज पाटील ६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. फूड अँड बेवरेज सर्विस व रूम डिविजन या गटामध्येही त्यांचा सहभाग होता. या ठिकाणी देखील त्यांनी चमकदार कामगिरी केली.
या विद्यार्थ्याना महाविद्यालयाचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर, सहाय्यक प्राध्यापक रुबेन काळे, सुरज यादव, रोहन हवालदार, रोहन वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे डी. वाय. पाटील अभिअमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर के मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले यांनी अभिनंदन केले.
पुणे- ‘आतिथ्य २०२४’ मध्ये सादरीकरण करताना दर्शन मोरे व आर्या संकपाळ.
डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलीटीला ‘आतिथ्य २०२४’ मध्ये उपविजेतेपद
|