बातम्या

महात्मा फुले यांना पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन

to Mahatma Phule on his death anniversary at Shahaji College


By nisha patil - 11/28/2023 12:35:45 PM
Share This News:



कोल्हापूर:श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज थोर समाज सुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना 133 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण व ज्येष्ठ प्रशासकीय सहकारी मारुती दावणे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. 
     

महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुरेश शिखरे यांनी महात्मा फुले यांचे जीवन, कार्य व सत्य धर्म याबद्दलची सविस्तर माहिती दिली. ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. डॉ शिवाजी जाधव यांनी आभार मानले. महाविद्यालयाचे प्रबंधक मनीष भोसले आयक्यूएससी समन्वय डॉ.आर.डी.मांडणीकर,सर्व प्राध्यापक,  प्रशासकीय सहकारी यावेळी उपस्थित होते. महात्मा फुले यांच्यावरील ग्रंथ संग्रहाचे प्रदर्शन शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने संपन्न झाले. संस्थेचे चेअरमन  श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमात प्रोत्साहन मिळाले.


महात्मा फुले यांना पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन