बातम्या

विवेकानंद कॉलेज मध्ये  नांदी फौंडेशन, पुणे यांचेतर्फे प्रशिक्षण

traning in swami v college


By Administrator - 1/1/2024 12:30:34 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेज मध्ये  नांदी फौंडेशन, पुणे यांचेतर्फे प्रशिक्षण

 प्रशिक्षणामध्ये टाईम मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, ग्रुमींग, मॉक इंटरव्हयू बाबत प्रशिक्षण 

 प्रशिक्षणाचे आयोजन महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने 

कोल्हापूर दि. 01 :  विवेकानंद  महाविद्यालयातील पदवी परीक्षा भाग 3 मधील  विद्यार्थिनींसाठी  नांदी फौडेशन, पुणे यांचे वतीने दि. 18 ते 23 डिसेंबर  व दि. 26 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले .  या प्रशिक्षणामध्ये टाईम मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, ग्रुमींग, मॉक इंटरव्हयू इत्यादी  विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने करण्यात आले.  हा ट्रेनिंग प्रोग्राम 12 दिवसाचा होता व यामध्ये 166 विद्यार्थिनींनी  सहभाग घेतला होता.  

या ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.  या प्रशिक्षणासाठी सीमा भागवत, विभागीय अधिकारी नांदी फौडेशन, पंकज दांडगे, महाराष्ट्र राज्य विभागप्रमुख, नांदी फौडेशन यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

हा ट्रेनिंग प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी प्रा एस पी थोरात,  प्रा. डॉ संजय लठ्ठे , प्रा डॉ राजश्री पाटील, डॉ अस्मिता तपासे, प्रा पल्लवी देसाई , प्रा.विजय पुजारी , प्रा सतीश चव्हाण यानी विशेष परिश्रम घेतले.


विवेकानंद कॉलेज मध्ये  नांदी फौंडेशन, पुणे यांचेतर्फे प्रशिक्षण