बातम्या

विवेकानंद च्या विद्यार्थ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट

visit to bajar samiti


By Administrator - 1/1/2024 1:22:27 PM
Share This News:



विवेकानंद च्या विद्यार्थ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट

 ई नाम योजने अंतर्गत केंद्र शासनाने ई ऑक्शन प्रणाली अंतर्गत कृषी विपणन ची माहिति देण्यात अली 

  शेतमालाची खरेदी विक्री, व्यवहार, लिलाव पध्दती, बाजार समितीच्या प्रणालीबाबतची दिली  माहिती

कोल्हापूर दि. 01 : विद्यार्थ्यांना शेतमालाची खरेदी विक्री, व्यवहार, लिलाव पध्दती, बाजार समिती प्रणाली समजून घेण्यासाठी  विवेकानंद  महाविद्यालयातील  अर्थशास्त्र व कॉमर्स विभागातील भाग 3 च्या  विद्यार्थ्यानी  कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीस शैक्षणिक भेट दिली.  यावेळी विद्यार्थ्यांनी  शेतमालाची खरेदी विक्री, व्यवहार, लिलाव पध्दती, बाजार समितीच्या प्रणालीमध्ये शेतकरी, अडते, व्यापारी यांची भूमिका समजून घेतली.

            तसेच या भेटीअंतर्गत ई नाम योजने अंतर्गत केंद्र शासनाने ई ऑक्शन प्रणाली अंतर्गत कृषी विपणन, राष्ट्रीय बाजार योजना व समितीचे भावी प्रकल्प इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांना देणेत आली.

            यावेळी बाजारसमितीच्या वतीने सुशांत मेढे पवार, योगेश खाडे व रोहित पाटील यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संदीप पाटील यानी केले तर आभार प्रा,पूजा पारीशवाड यांनी मानले.  या भेटीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र व कॉमर्स विभागाच्या वतीने

प्रा.डॉ.कैलास पाटील, प्रा. सनी काळे, प्रा.संदीप पाटील, प्रा सतीश चव्हाण यानी केले होते.  या वेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.


विवेकानंद च्या विद्यार्थ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट