बातम्या

जाहिरात, ॲनिमेशन व फोटोग्राफी या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी प्रसिध्द् चित्रकार श्री. अमित ढाणे

vivekanand college


By sunanada naik - 12/3/2024 3:30:28 PM
Share This News:



जाहिरात, ॲनिमेशन व फोटोग्राफी या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी

                                                    प्रसिध्द् चित्रकार श्री. अमित ढाणे


कोल्हापूर 12  : येथील विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (अधिकारप्रदत्त स्वायत्त) च्या बी.व्होक. विभागामार्फत ग्राफिक डिझाईन, ॲनिमेशन ॲण्ड फिल्म्‍ मेकींग  व फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कलाकृतींचे  स्पंदन कलाप्रदर्शन 2024  दिनांक 11 ते 13 मार्च 2024 या कालावधीत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन मध्ये आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे येथील प्रसिध्द् चित्रकार मा.अमित चंद्रकांत ढाणे यांच्या हस्ते  करण्यात आले. 

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, जाहिरात, फोटोग्राफी, ॲनिमेशन या क्षेत्रातील  कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाची उत्तम सोय विवेकानंद कॉलेजमध्ये असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.  या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम, जिद्द ,चिकाटी व सातत्यपूर्ण अभ्यास इ. ठेवल्यास नावलौकिक व अर्थप्राप्तीही करता येते. असे विचार मांडले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे  हे होते.  यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या कला प्रदर्शनातील कलाकृतींचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे  प्रसिध्द् चित्रकार मा.अमित ढाणे यांनी बी.व्होक अभ्यासक्रमाच्या नोडल ऑफिसर डॉ. श्रुती जोशी यांचे प्रत्यक्ष जलरंगात हुबेहुब व्यक्तीचित्र साकारले.  यावेळी संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे  यानी कलाप्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी विद्यार्थ्यांना कलेची सातत्यपूर्ण साधना करुन  जाहिरात, फोटोग्राफी, ॲनिमेशन या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवावे यासाठी मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले.

  विवेकानंद कॉलेजच्या बी.व्होक ग्राफिक डिझाईन विभागाची माजी  विद्यार्थिनी कु. सृष्टी सुनिल शिंदे हिचे नुकतेच रेबीजने निधन झाले आहे. तिच्या स्मृतिप्रित्यर्थ या प्रदर्शनामध्ये  रेबीज या रोगाविषयीची जनजागृतीपर माहितीचे पोस्टर्स् लावून तिला श्रध्दांजली वाहण्यात आली.  

कलाप्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बी.व्होक. विभागाने केले होते.  प्रास्ताविक व स्वागत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक व बी.व्होक विभागाच्या नोडल ऑफिसर  डॉ. श्रुती जोशी यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा.सतीश उपळावीकर यांनी करुन दिली.  या प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून प्रा.धिरज निंबाळकर यांनी आभार मानले.  सुत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले.

प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी, पालक, जाहिरात संस्था, कला रसिक घेत आहेत.  प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे रजिसट्रार श्री.आर.बी.जोग, प्रा. राहुल इंगवले, प्रा.महेश माळी, प्रा.रविराज सुतार, प्रा अभिजीत माने,  प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी  यांचे सहकार्य लाभले.


जाहिरात, ॲनिमेशन व फोटोग्राफी या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी