बातम्या

सकाळी चालता चालता करा ‘हा’ प्राणायाम, १० रोगांपासून मिळेल सूटका

while walking in the morning


By nisha patil - 3/23/2024 10:00:07 AM
Share This News:



चालणे हा सर्वात सोपा व्‍यायाम असून याच्यासोबत प्राणायामसुद्धा करता येऊ शकते. भ्रमण प्राणायाम आणि चालणे एकत्र करता येऊ शकते. हे एक प्रकारचे श्वास घेण्याचे तंत्र आहे. प्राणायाम करण्‍याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. आरोग्‍य चांगले ठेवण्‍यासाठी यापेक्षा सोपी पद्धत नाही.

असे करा भ्रमण प्राणायाम
चालत असताना शरीर पूर्ण सरळ ठेवावे. नंतर हळूहळू श्‍वास आत घ्‍यावा. श्‍वास घेताना तुम्‍ही १ ते ४ असे अंकही मोजू शकता. नंतर हळूहळू श्‍वास सोडायचा आहे. हा प्राणायाम करत असताना श्‍वास घेण्‍यासाठी जेवढा वेळ लावाल, त्‍यापेक्षा अधिक वेळ श्‍वास सोडण्‍यासाठी लावावा. श्‍वास घेतल्‍यानंतर ४ ते ५ पावले श्‍वास रोखून ठेवावा. आणि नंतर श्‍वास सोडावा. श्‍वास रोखून ठेवण्‍याची क्षमता हळूहळू वाढवावी. १० ते १५ पावलांपर्यंत श्‍वास रोखण्‍याची क्षमता वाढवा.

हे आहेत फायदे१ शरीर आणि फुप्‍फुसे मजबुत होतात.

२ हृदय चांगले राहते. हृदयविकाराच्‍या झटक्‍याची शक्‍यता कमी होते.

३ केस झडणे, सफेद होणे या समस्‍या दूर होतात.

४ टीबी, क्षयरोग, श्‍वासासंबंधी विकार, टायफाईड अशा रोगांपासून बचाव होतो.


सकाळी चालता चालता करा ‘हा’ प्राणायाम, १० रोगांपासून मिळेल सूटका