बातम्या

हे’ 1 आसन केल्यास दूर होतील अनेक आजार, जाणून घ्या

will be cured by doing this 1 asana


By nisha patil - 1/4/2024 7:19:11 AM
Share This News:



आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेले लोक औषधोपचारावर हजारो रूपये खर्च करत असतात. परंतु, आजारांपासून त्यांची लवकर सुटका होत नाही. मुळात आजार होऊच नये, यासाठी नेहमी शरीराची काळजी घेतली पाहिजे. तसेच सकस आहार आणि योग्य व्यायाम निवडला पाहिजे. यासाठी योग निद्रा केल्यास मनाला शांती मिळते, तसेच आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतात.

अशी करा योग निद्रा

जमीनीवर पाठीवर झोपा. दोन्ही पायांमध्ये किमान एका फुटाचे अंतर ठेवा. हात कमरेपासून सुमारे सहा इंच लांब ठेवा. डोळे बंद करुन शरीराला आराम द्या. ही क्रिया ३० मिनिटे करा.


हे आहेत ७ फायदे

१) अस्थमाच्या आजारात योग निद्रा लाभदायक आहे.
२) एकाच ठिकाणी तासनतास बसल्याने मानदुखी, सर्वायकलची समस्या होते. यासाठी योग निद्रा लाभदायक आहे.
३) योग निद्रा केल्याने महिलांची कंबरदुखीची समस्या दूर होऊ शकते.
४) योग निद्रामुळे शरीर शांत होऊन रक्तदाब नियंत्रणात राहतो.
५) मधुमेह असणारांना योग निद्रा खूपच फायदेशीर ठरु शकते.
६) हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी योग निद्रा खूप चांगला उपाय आहे.
७) योग निद्रा केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो.


हे’ 1 आसन केल्यास दूर होतील अनेक आजार, जाणून घ्या