बातम्या
ओबीसी समाज बांधव यांच्यावर होत असलेला अन्याय थांबवा
By Administrator - 3/1/2024 3:05:52 PM
Share This News:
ओबीसी समाज बांधव यांच्यावर होत असलेला अन्याय थांबवा
जिल्हाधीकारी कोल्हापूर याना यशवंत ब्रिगेड यांचेमार्फत दिले मागणीचे निवेदन
ओबीसीवर होत असलेला अन्याय थांबवून मराठा समाजास वेगळ्या प्रकारे आरक्षण द्यावे
कोल्हापूर : सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असताना मराठा समाजास ओबीसीमधून आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे. यामुळे धनगर, माळी,तेली,वाणी,शिंपी, नाभिक, रामोशी, परीट, वंजारी, बंजारा, सुतार, साळी, कोळी, सोनार, कोष्टी, जंगम, गुरव, लोहार, मोमीन, कुंभार, कासार, गवळी,वडार, हेळवी, तांबट, विणकर अशा अनेक छोट्या छोट्या समाजावर अन्याय होणार आहे. त्यांचे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक अस्तित्व समाप्त होण्याचा धोका आहे.
आमचा मराठा आरक्षणास विरोध नाही परंतू त्यांना वेगळ्या प्रकारे आरक्षणाची तरतूद करण्यात यावी. त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये. आत्तापर्यंत काका कालेलकर, बी. पी. मंडल या राष्ट्रीय व आठहून अधिक राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा मागास नाहीत असे नमूद केले आहे. सत्तेचे सर्व अधिकार या वर्गाकडे असताना हे ओबोसीतून आरक्षण मागत आहेत.
आजही बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार अजून विकासाच्या प्रवाहात आले नाहीत. त्यांच्या आरक्षणाचा अधिकार मोठ्या संख्येने असलेल्या व परंपरेपासून सत्तेत असलेल्या प्रस्थापित मराठा समाजाकडे गेला तर ओबीसी समाज सदैव अधिकारापासून वंचित राहतील. त्यामुळे ओबीसी समाज बांधव यांच्यावर होत असलेला अन्याय थांबवून मराठा समाजास वेगळ्या प्रकारे आरक्षणाची तरतूद करण्यात यावी अशी मागणी यशवंत ब्रिगेड मार्फत केली आहे
ओ बीसी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन देत असताना यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष कोळेकर, अमोल गावडे, अविनाश गावडे, दादासो कोळेकर,कैलास काळे, यशवंतराव शेळके,रावसो रानगे, प्रकाश गोरड, विलास अनुसे, मल्हार येडगे,सुजित बंडगर, संजय पटकारे, वासुदेव कोकरे, विशाल दाभाडे,महादेव पुजारी, विजय शिंदे, संदीप वडर,संदीप हजारे, सिद्धू दिवटे, नवला रानगे, संदीप झोरे, नामदेव लांबोर, योगेश देवकुळे, दीपक शेळके, अविनाश गायकवाड, अनिकेत सावंत,देवबा हजारे, हर्षवर्धन शिंगाडे, विजय येडगे,ऋषिकेश माने,सीमा झोरे, मेघना गावडे, स्वाती वाघमोडे, संगीता शेळके, योगिता घुले, सारिका पुजारी, संगिता पुजारी, सुजाता नाईक, विद्या लवटे इ. समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओबीसी समाज बांधव यांच्यावर होत असलेला अन्याय थांबवा
|