बातम्या

योगासने सुरू करताय ? मग या सूचनांचे आवश्य पालन करा

yoga Then follow these instructions


By nisha patil - 2/29/2024 7:26:22 AM
Share This News:



गुप्त शक्तींना जागृत करण्यासाठी योगासने खूप आवश्यक आहेत. आसनांच्या अभ्यासाने शरीर निरोगी, मन प्रसन्न व बुद्धी तीक्ष्ण होते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सुखद स्वप्न साकार करण्याची गुरुकिल्ली अंतर्मनात असून अद्भुत सामर्थ्य प्रगट करण्यासाठी ऋषींनी समाधीतून प्राप्त झालेल्या या आसनांचे अवलोकन केले आहे. शौच-स्नानादीनंतर आसने केली गेली तर उत्तम असते. श्वास तोंडाने न घेता नाकानेच घेतला पाहिजे.
 

आसने केल्यानंतर थंडीत किंवा किंवा जोराच्या वाऱ्यात बाहेर निघू नये. स्नान करावयाचे असल्यास थोड्यावेळाने करावे. आसन करतेवेळी शरीरावर कमीतकमी व सैल कपडे असावेत. स्त्रियांनी गरोदर अवस्थेत तज्ज्ञांच्या सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही आसन करू नये. आसनानंतर थोडे ताजे पाणी पीणे लाभदायक ठरते. ऑक्सिजन व हायड्रोजनमध्ये विभाजन होऊन संधी स्थानातील भागातून मल काढण्यासाठी पाणी खूप आवश्यक असते.

योगासने करताना घोंगडी, पोते असे काही अंथरून त्यावरच आसने करावीत. उघड्या जमिनीवर काही न अंथरता कधीही आसने करू नयेत. ज्यामुळे शरीरात निर्माण झालेला विद्युत-प्रवाह नष्ट होणार नाही. आसन करताना शरीरासोबत जबरदस्ती करू नये. कारण आसन म्हणजे कसरत नसून व्यायामाचाच एक वेगळा प्रकार आहे, हे लक्षात असू द्यावे.


योगासने सुरू करताय ? मग या सूचनांचे आवश्य पालन करा