रोजंदारी कर्मचाऱ्यांना महिन्यातील 26 दिवस काम द्यावे अन्यथा बीआरएस पक्षाच्या वतीने गुरुवारी कामकाज बंद पाडू
By Administrator - 7/20/2024 2:52:54 PM
Share This News:
रोजंदारी कर्मचाऱ्यांना महिन्यातील 26 दिवस काम द्यावे अन्यथा बीआरएस पक्षाच्या वतीने गुरुवारी कामकाज बंद पाडू
महापालिकेने रिक्त पदे न भरल्यामुळे रोजंदारी कामगारांच्या भरवशावर कामकाज चालू आहे. आरोग्य विभाग ,पवडी विभाग पाणीपुरवठा विभाग यामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे 600 च्या आसपास आहे. या कर्मचाऱ्यांना विशेषता शहराला पाणी सोडण्यासाठी तसेच ड्रेनेज सफाईसाठी रोजंदारी कामगार यांच्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना प्रशासकांमार्फत आदेश काढून 26 दिवसां ऐवजी 18 दिवस काम करण्याचा फतवा काढला आहे जर हा आदेश मागे घेऊन 18 दिवस ऐवजी 26 दिवस काम न दिल्यास महापालिकेचे कामकाज बी आर एस पक्षाच्या वतीने गुरुवारी बंद पाडण्यात येईल .संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचे काम महापालिका प्रशासनाने करू नये .पाणीपुरवठा विभागामध्ये पाणी सोडण्यासाठी जवळपास 100 रोजंदारी असून, सफाईसाठी 280 कर्मचारी कार्यरत आहेत ते जर संपावर केले तर शहरवासीयांना प्रचंड मानसिक त्रास होणार आहे किंबहुना पाणी आणि आरोग्य विभागामुळे शहरवासीयांची कुचुंबना होणार आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार गुरुवारपासून त्यांना काम देता येणार नाही जर हा निर्णय तातडीने जिल्हाधिकारी तथा प्रशासक व अतिरिक्त आयुक्त यांनी तातडीने न सोडवला तर आम्हाला उग्र आंदोलन करून प्रशासकीय कामकाज उद्या बंद पाडावे लागेल याची नोंद घ्यावी
निवेदनाच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे तसेच आंदोलन न करण्याची विनंती केली आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी तथा प्रशासक महापालिका यांच्याशी आजच चर्चा करून विषय सोडवणार असे आश्वासन त्यांनी बी आर एस पक्षाचे नेते संजय पाटील यांना दिले आहे
|