बातम्या

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यामंदिर पासार्डे शाळेला सर्वसाधारण विजेतेपद

Bahireshwar Friday 6


By nisha patil - 12/20/2024 2:14:17 PM
Share This News:



बहिरेश्वर प्रतिनिधी - आमशी केंद्रांतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये विद्या मंदिर पासार्डे शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

कुमार सांगरूळ शाळेच्या मैदानावर केंद्रप्रमुख माननीय संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन  श्री. बदाम खाडे यांचे हस्ते झाले.कुमार सांगरूळ  शाळेचे मुख्याध्यापक श्री. यादव सर यांनी उपस्थित  शिक्षक व सर्व स्पर्धकांचे स्वागत करून सर्वांनी खिलाडू वृत्तीने सहभागी होण्याचे आवाहन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे===
मोठा गट मुले कबड्डी - प्रथम विद्या मंदिर पासर्डे, द्वितीय विद्यामंदिर म्हारुळ.
मुली कबड्डी - प्रथम विद्या मंदिर पासर्डे द्वितीय विद्या मंदिर म्हारूळ
खोखो मुले- प्रथम विद्यामंदिर बहिरेश्वर, द्वितीय विद्यामंदिर पासार्डे,
खोखो मुली -प्रथम विद्यामंदिर बहिरेश्वर, द्वितीय विद्यामंदिर पासार्डे,
रिले 4×100 मुले _ प्रथम विद्यामंदिर पासर्डे,द्वितीय विद्यामंदिर बहिरेश्वर,
रिले 4×100 मुली - प्रथम विद्यामंदिर बहिरेश्वर द्वितीय विद्यामंदिर पासार्डे,
100 मीटर धावणे मुले - प्रथम सुदर्शन सुळेकर, द्वितीय अमित काळे, तृतीय श्रेयस कवडे,
100 मीटर धावणे मुली - प्रथम श्रुतिका काळे, द्वितीय मनाली पाटील, तृतीय सोनाली कांबळे
200 मीटर धावणे मुले- प्रथम विराज पाटील, द्वितीय श्रेयस पाटील, तृतीय समर्थ चौगुले
200 मीटर धावणे मुली -प्रथम सायली काशीद, द्वितीय अनुष्का पाटील, तृतीय अनुष्का काळे
400 मीटर धावणे मुले -प्रथम स्वप्निल चौगुले, द्वितीय राजवीर चव्हाण,
  तृतीय आदित्य दिंडे 
400 मीटर धावणे मुली - प्रथम सानवी चौगुले, द्वितीय शर्वरी चौगुले, तृतीय सिद्धी पाटील
लांब उडी मुले- प्रथम राजवीर चव्हाण, द्वितीय सुदर्शन सुळेकर, तृतीय प्रेम चौगुले
लांब उडी मुली - प्रथम भक्ती चौगुले, द्वितीय सिद्धी पाटील, तृतीय निकिता चौगुले
उंच उडी मुले- प्रथम विराज पाटील, द्वितीय रुद्र सुतार
उंच उडी मुली -प्रथम प्रज्ञा कांबळे, द्वितीय वेदिका चौगुले
गोळा फेक मुले -प्रथम अमित काळे, द्वितीय विराज पाटील
थाळीफेक मुले- प्रथम अमित काळे, द्वितीय विराज पाटील
कुस्ती 40 किलो वजन गट मुले -प्रथम अमित काळे, द्वितीय शार्विल पाटील,
कुस्ती 40 किलो गट मुली- प्रथम आकांक्षा धनाजी पाटील ,
45 किलो वजन गट कुस्ती मुले -विराज युवराज चौगुले
लहान गट निकाल पुढीलप्रमाणे -
-------=====-----------
लहान गट कबड्डी मुले - - - - प्रथम विद्या मंदिर म्हारूळ,द्वितीय विद्यामंदिर पासर्डे
कबड्डी मुली प्रथम- विद्यामंदिर पासर्डे, द्वितीय विद्यामंदिर खटांगळे
खो खो मुले- प्रथम केंद्र शाळा आमची द्वितीय कुमार सांगरूळ
खो खो मुली - प्रथम विद्यामंदिर पासर्डे द्वितीय विद्यामंदिर बहिरेश्वर
50 मीटर धावणे मुले- प्रथम अथर्व चौगुले, द्वितीय तेज शिंदे तृतीय आयुष्य चौगुले
50 मीटर धावणे -मुली प्रथम सृष्टी मोहिते द्वितीय राजनंदिनी दिंडे तृतीय आरोही दिलीप गोसावी
100 मीटर धावणे मुले- प्रथम अथर्व चौगुले, द्वितीय प्रेम पाटील,तृतीय रोहन पाटील
100 मीटर धावणे मुली- प्रथम आराध्या पाटील, द्वितीय अंकिता काळे, तृतीय संचिता चौगुले
लांब उडी मुले -प्रथम वरून सातपुते, द्वितीय अथर्व कोपर्डे, तृतीय स्वयंम सागर सुतार
लांब उडी मुली -प्रथम राजश्री पाटील, द्वितीय सारा गुरव,तृतीय अंकिता काळे
उंच उडी मुले- प्रथम अर्णव नाळे,द्वितीय सिद्धेश पाटील
उंच उडी मुली प्रथम अंकिता काळे, द्वितीय आरोही सरदार कवडीक
25 किलो कुस्ती गट मुले- प्रथम आदिनाथ रामदास पाटील,द्वितीय अंश दगडू कांबळे
30 किलो कुस्ती गट मुले- प्रथम पृथ्वी हंबीरराव कांबळे, द्वितीय राजवीर कृष्णात पाटील
30 किलो कुस्ती गट मुली- प्रथम जानवी दिलीप पाटील
35 किलो वजनी गट कुस्ती मुले - प्रथम सर्वज्ञ दत्तात्रय पाटील,द्वितीय आदित्य अमर काळे
35 किलो वजनी गट कुस्ती- मुली प्रथम अनुष्का ज्ञानदेव काळे, द्वितीय वैष्णवी संदीप पाटील.
 

पंच म्हणून भोलानाथ भोसले,बाजीराव नाळे, प्रशांत व्हनाळे,अमर कोरवी,महादेव जाधव, शिवाजी पाटील, शिवाजी खाडे, नाना सुतार, राहुल गावडे, नामदेव कुंभार, शरद बुकशेटे,धनाजी सासणे, श्रीकांत टिपगडे, अश्विनी परीट,कमल खाडे, लिला सावंत, रोहिणी घराळ यांनी काम पाहिले.
 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. यशवंत यादव, श्री. चंद्रकांत धुमाळ, श्री. टिपूगडे सर, श्री. परिट सर यांनी मोलाचे सहकार्य केले.


केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यामंदिर पासार्डे शाळेला सर्वसाधारण विजेतेपद