बातम्या

दीप पब्लिक स्कूलच्या 'निवेदिताचे'गिनीज बुक मध्ये धवल यश

Dip public school


By nisha patil - 12/20/2024 2:11:31 PM
Share This News:



कोल्हापूर कोल्हापूर येथील  जयसिंगपूर येथील राजश्री फाउंडेशन संचलित दीप पब्लिक स्कूलच्या कु. निवेदिता  अमर शिंदे ह्या विद्यार्थिनीने नॉन स्टॉप ७५ तास स्केटिंग,  फास्टेस्ट रिव्हर्स स्केटिंग व तेज रोलर स्केटिंग प्रकारात 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये आपला सहभाग नोंदवून शाळेचे , जिल्ह्याचे तसेच देशाचे नाव उंचावले. संस्थेचे चेअरमन डॉ. विजयराज मगदुम आणि  व्हा.चेअरमन डॉ. सोनाली मगदुम यांनी कु. निवेदताचे अभिनंदन केले भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

              

कु. निवेदिताने मेजर ध्यानचंद पुरस्कार, क्रिडारत्न पुरस्कार' व व्ही. आय.पी. पर्सन कार्ड मिळवले आहे तसेच आय. एस.हॉकी स्केटींग दिल्ली मध्ये गोन्ड  मिडल, आंतराराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक, व थायलंड येथे आंतरराष्ट्रीय स्केटींग मध्ये सहभाग नोंदवला आहे.सदर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहा देशातील स्पर्धक सहभागी झाले होते.
         

कु. निवेदितास मुख्याध्यापिका सौ. नमिता जैन अध्यापिका सौ. विद्या मशाळकर, क्रिडा शिक्षक संदीप शहारे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.


दीप पब्लिक स्कूलच्या 'निवेदिताचे'गिनीज बुक मध्ये धवल यश