मुंबईच्या दिवा स्टेशनमध्ये रणरागिनींचा गोंधळ

Confusion of Ranragini in Mumbais Diva Station
By Administrator - 7/20/2024 2:18:24 PM
Share This News:

मुंबईच्या दिवा स्टेशनमध्ये रणरागिनींचा गोंधळ

मुंबईला कामाला जाण्यासाठी चाकरमान्यांची मध्य रेल्वे कडून होणारी गैरसोय नेहमीच प्रवाशांना अनुभवायला मिळते. असाच एक प्रकार आज सकाळी दिवा रेल्वे स्थानकात घडला. लोकल काही वेळ थांबली आणि लगेच निघाली त्यामुळे काही महिलांनी लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. चक्क एक महिला तर मोटरमनच्या केबिनमध्येच चढून तिने लोकल थांबवली आणि 10 ते 15 मिनिटे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.दिवा स्थानकात मोठा गोंधळ झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. लोकलमध्ये महिलांनी गोंधळ घातल्याने रेल्वे वाहतूक उशिराने असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी पाच महिलांना ताब्यात घेतलं आहे. यामुळे पहाटेपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने धावत आहे. पहाटे दिवा स्थानकात गोंधळ घडल्याची माहिती आहे.सकाळी 6.23 ची सीएसएमटी फास्ट लोकल अर्धा तास उशिराने आली, नेहमी प्लॅटफॉर्म 4 वर येणारी हीच लोकल प्लॅटफॉर्म 2 वर आली. आधीच उशीर त्यात प्लॅटफॉर्म बदलला, त्यामुळे लोकलमधील गर्दी वाढली. काही महिला दरवाजात लटकत होत्या. हे सांगण्यासाठी एक महिला मोटरमनच्या केबिनमध्ये चढली. या सर्व गोंधळामुळे अजूनही मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन उशिराने धावत आहेत.महिला मोटरमनच्या केबिनमध्ये चढल्याने लोकल 10 मिनिटे थांबली. या महिलेचं म्हणणे हेच होते की, महिला लटकत आहेत थोडा वेळ थांबा. हे बघून आरपीएफ आणि जीआरपी तिथे आले. यावेळेच बाकी प्रवासीही मोठ्या प्रमाणात जमा झाले आणि मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अखेर मोटरमनच्या केबिनमधून खाली उतरली आणि लोकल सुटली. 

मात्र आता कारवाई करण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफने 5 महिलांना ताब्यात घेतलं आहे. या महिला सध्या दिवा स्थानकात जीआरपी ऑफिसमध्ये आहेत. दरम्यान, या महिलांवर कारवाई होऊ नये म्हणून दिवा प्रवासी संघटना प्रयत्न करत आहे.