बातम्या

१० लाखाचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त .

10 lakh Goan fake liquor stock seized


By nisha patil - 1/2/2025 4:25:37 PM
Share This News:



१० लाखाचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त .

कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियम परिसरात कारवाई

 राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या पथकाने बेकायदेशीर गोवा बनावटीच्या मद्यसाठा वाहनासह जप्त केलाय. आज पहाटे ५. ३० वाजता हॉकी स्टेडियम परिसरात हि कारवाई करण्यात आलीय . याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा इथल्या डॅरेल ॲलेक्स फर्नांडिस याला अटक करण्यात आलीय . त्याच्याकडून १० लाख ६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय .

 राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या पथकास बेकायदेशीर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार शहरातील सायबर चौक ते हॉकी स्टेडियम रोडवर सापळा लावण्यात आला.आज शनिवारी पहाटे ५. ३० वाजण्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम जवळील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात एक संशयित बलेनो गाडी येताना दिसली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही गाडी अडवली.गाडीची झडती घेतली असता पाठीमागील सीट व डीग्गीमध्ये लपवून ठेवलेले विविध ब्रँडचे मद्याचे ७५ बॉक्स आढळून आले. याप्रकरणी शिरोडा इथल्या डॅरेल फर्नांडिस याला अटक ठरण्यात आलीय . त्याचजवळून ५ लाख ६ हजार ४०० रुपयांचे मद्य व वाहतुकीस वापरलेली कार असा एकूण १० लाख ६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय .

हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे , उप अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली , निरीक्षक रोहिदास वाजे ,सत्यवान भगत ,सरिता पाटणे , जवान राहुल गुरव ,गणेश सानप , पंकज खानविलकर यांनी केली .


१० लाखाचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त .
Total Views: 40