बातम्या
कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांचा विकास; १०० ई-बसेस लवकरच दाखल होणार-खासदार धनंजय महाडिक
By nisha patil - 4/1/2025 3:15:02 PM
Share This News:
कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांचा विकास; १०० ई-बसेस लवकरच दाखल होणार -खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर शहरातील ड्रेनेज, पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली. त्यांनी सांगितले की, १०० ई-बसेस केएमटीच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा गतीने उभारली जातील. याशिवाय, शहरातील पाणी पुरवठा सुधारण्यासाठी १२ पैकी ११ टाक्या पूर्ण झाल्या आहेत, तसेच अमृत योजनेंतर्गत ड्रेनेज आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालू आहेत. खासदार महाडिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले
.
कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांचा विकास; १०० ई-बसेस लवकरच दाखल होणार
|