विशेष बातम्या

केएमटीच्या ताफ्यात लवकरच १०० नवीन ई-बसेस

100 new e buses to join KMT fleet soon


By nisha patil - 2/4/2025 3:26:37 PM
Share This News:



केएमटीच्या ताफ्यात लवकरच १०० नवीन ई-बसेस

प्रवाशांसाठी अधिक सोयीसुविधा आणि पर्यावरणपूरक सेवा

केएमटीच्या आर्थिक सुधारण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन

प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक सेवा देण्यासाठी केएमटीच्या ताफ्यात लवकरच १०० नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. केएमटीच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, केएमटीच्या शास्त्रीनगर येथील यंत्रशाळेत प्रशासक मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले.
 

यावेळी बोलताना, के. मंजुलक्ष्मी यांनी सध्या केएमटीकडे ६६ बसेसच्या माध्यमातून दैनंदिन वाहतूक सेवा सुरू असल्याचे सांगितले. पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गत १०० नवीन इलेक्ट्रिक बसेस लवकरच ताफ्यात दाखल होतील, यामुळे प्रवाशांना अधिक सोयीसुविधा मिळतील आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था उभारण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, केएमटीच्या आर्थिक तूट भरून काढण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 

या कार्यक्रमाला अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, वर्क्स मॅनेजर दीपक पाटील, लेखापाल राजेंद्र सूर्यवंशी, अंतर्गत लेखापरीक्षक दिनेश सोमण, जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


केएमटीच्या ताफ्यात लवकरच १०० नवीन ई-बसेस
Total Views: 26